Wed, May 31, 2023

अंमली पदार्थ
अंमली पदार्थ
Published on : 9 February 2023, 6:57 am
अमली पदार्थांची विक्री होत असल्याचे
समजल्यास माहिती द्यावी : बलकवडे
कोल्हापूर ः जिल्ह्यात अमली पदार्थांची उत्पादन आणि विक्री होत असल्याचे समजल्यास माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले.
जिल्हास्तरीय अमली पदार्थविरोधी समितीची बैठक पोलिस अधीक्षक कार्यालयात झाली. त्यामध्ये ते बोलत होते. अमली पदार्थांबाबतची माहिती ८४११८४९९२२ या व्हॉटस् ॲप क्रमांकावर द्यावी, असेही त्यांनी सांगितले. बैठकीस पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, कायदा सल्लागार गौरी पाटील, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त आश्विन ठाकरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे, सामाजिक न्याय विभागाच्या कल्पना पाटील, पोस्ट ऑफिसचे प्रसाद तेरेदेसाई, लोहमार्ग पुणे विभागाचे व्ही. आर. पाटोळे आदी उपस्थित होते.