विज्ञान दिनानिमित्त विविध स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विज्ञान दिनानिमित्त विविध स्पर्धा
विज्ञान दिनानिमित्त विविध स्पर्धा

विज्ञान दिनानिमित्त विविध स्पर्धा

sakal_logo
By

विज्ञान दिनानिमित्त विविध स्पर्धा
गडहिंग्लज, ता. १० : मराठी विज्ञान परिषदेच्या येथील शाखेतर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. २७ फेब्रुवारीला सर्व वयोगटातील महिलांसाठी पाककला स्पर्धा होणार आहे. दुपारी साडेबारा ते दीड या वेळेत सायन्स सेंटरच्या सभागृहात ही स्पर्धा होईल. विजेत्यांना अनुक्रमे ५००, ३०० व २०० रुपयांचे बक्षीस आहे. मराठी विज्ञान परिषद, पुणे यांच्या सौजन्याने विज्ञान रंजन स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी वय व शिक्षणाची अट नाही. प्रश्नपत्रिका सायन्स सेंटरमध्ये उपलब्ध केल्या आहेत. १७ फेब्रुवारीपर्यंत स्पर्धकांनी उत्तर पत्रिका जमा करायच्या आहेत. २४ फेब्रुवारीला दुपारी अडीचला प्रश्नमंजूषा (लेखी) स्पर्धा होणार आहे. सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गडहिंग्लज, नूल, हलकर्णी, नेसरी, महागाव, उत्तूर, कौलगे, निपाणी, आंबोली, संकेश्वर या केंद्रावर परीक्षा होतील. प्रत्येक केंद्रातील प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांची तोंडी अंतिम फेरी होईल. २५ फेब्रुवारीला सकाळी नऊला सायन्स सेंटरमध्ये ही अंतिम फेरी होईल. इच्छुक स्पर्धकांनी संपर्क करावा, असे आवाहन केले आहे.