बहिरेवाडीचे श्रद्धास्थान : श्री महालक्ष्मी देवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बहिरेवाडीचे श्रद्धास्थान : श्री महालक्ष्मी देवी
बहिरेवाडीचे श्रद्धास्थान : श्री महालक्ष्मी देवी

बहिरेवाडीचे श्रद्धास्थान : श्री महालक्ष्मी देवी

sakal_logo
By

पुरवणी हेड : श्री महालक्ष्मी यात्रा विशेष, बहिरेवाडी, ता. आजरा
-------------------------------------------
gad102.jpg :
81768
श्री महालक्ष्मीची उत्सव मूर्ती
-----------------------------
gad103.jpg :
81769
बहिरेवाडीचे श्री महालक्ष्मी मंदिर.
---------------------------------------------
बहिरेवाडी (ता. आजरा) येथील महालक्ष्मी देवीची यात्रा पाच वर्षांनंतर यंदा साजरी होत आहे. यानिमित्त श्री महालक्ष्मी मूर्ती मिरवणूक, धार्मिक, करमणूक कार्यक्रमांसह विविध स्पर्धा होणार आहेत. या यात्रेच्या तयारी विषयी...
- अशोक तोरस्कर, उत्तूर
-----------------------------

बहिरेवाडीचे श्रद्धास्थान : श्री महालक्ष्मी देवी

गावात पाच वर्षांनी महालक्ष्मी देवीची यात्रा होत आहे. ७ फेब्रुवारीपासून त्याची सुरुवात झाली आहे. महालक्ष्मी मूर्ती मिरवणूक, आकर्षक आतषबाजी, धार्मिक व करमणूक कार्यक्रमांसह बैलगाडी, घोडागाडी शर्यती, विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. लक्ष्मीची मूर्ती पांडूरंग सुतार यांच्या घरी ठेवली जाते. पूजेनंतर ही मूर्ती सुतार गल्लीत खेळवली जाते. त्यानंतर मानाच्या पूजेसाठी पाटीलवाड्यासमोर लक्ष्मी थांबते. तेथून गावचावडीकडे लक्ष्मीची मिरवणूक मार्गक्रमण होते. ही मिरवणूक लक्ष्मी मंदिराजवळ विसर्जित होते. लक्ष्मी खेळवण्यासाठी गावासह परिसरातील नागरिक सहभागी होतात.
१८५६ पासून दर पाच वर्षांनी बहिरेवाडीच्या महालक्ष्मी देवीची यात्रा दिमाखात साजरी होते. यंदाच्या यात्रेला १६७ वर्षे होत आहेत. सरसेनापती श्री संताजी घोरपडे यांच्या काळातील लष्करी छावणीतील हे गाव आहे. इचलकरंजी जहागिरदार संस्थानच्या काळात महालक्ष्मी यात्रेस सुरुवात झाली. गावावरचे संकट दूर झाले की गावकरी यात्रेचे नियोजन करायचे. यातूनच यात्रेची प्रथा सुरू झाली. त्यानंतर लक्ष्मीची यात्रा दर पाच वर्षांनंतर होऊ लागली.
कांद्याचे गाव म्हणून बहिरेवाडीची ओळख आहे. गावाला नदी व मोठा नालाही नाही. विहिरीच्या उपलब्ध पाण्यावर शेतकऱ्‍यांनी कांदा उत्पादनातून आर्थिक स्थैर्य मिळवले आहे. गावातील ३६०० हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे. गावाला हडलगा, बड्याचीवाडी, वडरगे, बेकनाळ, कडगाव, मुमेवाडी, हणबरवाडी, बेरडवाडी, बाळेघोल, तमनाकवाडा, वडगाव अशा तेरा गावच्या सीमा असणारे तालुक्यातील बहिरेवाडी एकमेव आहे. १५ वर्षांपूर्वी एका शेतकऱ्यापासून कांदा उत्पादनाची झालेली सुरुवात आता शंभर शेतकऱ्‍यांर्यंत पोहोचली आहे. कांद्याचे उत्पादक वाढवण्यासाठी भैरवनाथ शेतकरी मंडळ प्रयत्नशील आहे.

* यात्रेचे नियोजन
महालक्ष्मी देवी यात्रा व्यवस्थापन समितीकडून यात्रेचे नियोजन केले आहे. यात्रेनिमित्त परगावाहून येणाऱ्‍या नागरिकांच्या वाहनासाठी पार्किंग, पिण्याचे पाणी, स्वच्छता, पोलिस बंदोबस्त, यात्रा काळात २४ तास वीजपुरवठ्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी सरपंच रत्नजा सावंत, उपसरपंच दत्तात्रय मिसाळ, सुरेश खोत, सुहास चौगुले, विकास चोथे, युवराज कांबळे, उषा सुतार, उल्का गोरुले, सरिता जोंधळे, स्वाती चव्हाण, मालन मोरे, भाग्यश्री आयवाळे, ग्रामविकास अधिकारी अमृत देसाई, राजलक्ष्मी खोत, संजय कांबळे, गोविंद सावंत, अनिल चव्हाण, अर्जुन कुंभार, दत्तात्रय गोरुले, चंद्रकांत गोरुले, अण्णाप्पा पाटील, बंडोपंत मिसाळ, बंडोपंत चौगुले, राजाराम चव्हाण, संजय शेणगावे, पांडुरंग आडावकर, अर्जुन मिसाळ, अशोक कांबळे, अशोक माने, राजाराम फराकटे आदी यात्रेच्या नियोजनात आहेत.

* दोन दिवसांतील कार्यक्रम
- शनिवार (ता. ११) श्री महालक्ष्मी देवीची पूजा व भोजनाचा कार्यक्रम.
- सोमवार (ता. १३) सायंकाळी सात वाजता महालक्ष्मी देवी पावण करणे कार्यक्रम.

* बहिरेवाडीचे वैभव...
गावचे सुपुत्र व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिक्षणतज्‍ज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांचे स्मारक उभारले आहे. स्मारकाभोवती नक्षीदार जांभ्या दगडांची संरक्षक भिंत बांधली आहे. स्मारकासाठी एक कोटी ६७ लाखांचा खर्च झाला असून हे स्मारक विद्यार्थी, शिक्षकांना प्रेरणादायी ठरत आहे. डॉ. नाईक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त केंद्र शासनाने टपाल तिकीटही काढले होते. स्मारक उभारून शासनाने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. या स्मारकात ३७१० चौरस मीटरचा हॉल बांधला आहे. स्मारकाजवळील गावतळ्याचे सुशोभीकरणही केले आहे.