श्री विश्‍वकर्मा सुवर्णकार समाज संस्थेतर्फे कार्यक्रम

श्री विश्‍वकर्मा सुवर्णकार समाज संस्थेतर्फे कार्यक्रम

81885
कोल्हापूर : श्री विश्वकर्मा सुवर्णकार समाज संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमप्रसंगी उपस्थित मान्यवर.

श्री विश्‍वकर्मा सुवर्णकार
समाज संस्थेतर्फे कार्यक्रम
कोल्हापूर : श्री संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज पुण्यतिथी निमित्त श्री विश्‍वकर्मा सुवर्णकार समाज संस्थेतर्फे मोफत हृदयरोग, रक्तदाब, डोळे तपासणी, मोफत मोतिबिंदू तपासणी शिबीर फुलेवाडी दत्तमंदिर येथील पांडुरंग माने सांस्कृतिक भवन येथे झाले. मनोहर देवळेकर, प्रभाकर पोतदार, दिनकर पोतदार, मारुती पोतदार, आण्णासो पोतदार, श्री विश्‍वकर्मा सुवर्णकार समाज संस्थेचे उपाध्यक्ष पांडुरंग पोतदार, सचिव अनिश पोतदार, युवक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष शशिकांत पोतदार, उपाध्यक्ष मिनेष पोतदार, महिला मंडळ अध्यक्ष उषा पोतदार, उपाध्यक्ष अलका पोतदार, संचालक, समाजबांधव उपस्थित होते. श्री संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज, श्री विश्वकर्मा, श्री विश्वकर्मा सुवर्णकार समाज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष (कै.) संजय पोतदार यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. ५५ व्यक्तिंनी रक्तदान केले. तसेच १५० महिला-पुरुषांनी हृदयरोग तपासणी, नेत्र तपासणी, मोती बिंदू शस्त्रक्रियेकरिता १५ व्यक्तिंनी नावाची नोंदणी झाली. वधू-वर परिचय कार्यक्रमही झाला. बालकलाकारांनी नृत्यविष्कार सादर केले.
--------------------
81874
कोल्हापूर : भाऊसाहेब गणपुले यांच्या गौरवप्रसंगी अनिश पोतदार, ॲड. संजय गायकवाड, गोपाळराव कारेकर आदी.

भाऊसाहेब गणपुले यांचा गौरव
कोल्हापूर : भाजपचे ज्येष्ठ नेते प्र. द. तथा भाऊसाहेब गणपुले यांनी ८५ व्या वर्षात प्रर्दापण केल्यामुळे त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला होता. ज्येष्ठ बासरी वादक गोपाळराव कारेकर यांच्या हस्ते गणपुले यांचा शाल आणि श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. गणपुले म्हणाले, ‘‘हिंदूधर्मातील रूढी परंपरांचे जतन करून हिंदू धर्मातील विचारधारा अधिक बळकट करण्यासाठी आजच्या नव्या पिढीने अधिक प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. वयाच्या ८५ व्या वर्षात पर्दापण करीत असताना गोरगरीब, पिडीतांचे प्रश्न सोडविण्यासाठी माझ्याकडून जे कार्य झाले, त्याबद्दल मी समाधानी आहे.’’ अॅड. संगिता तांबे यांनी स्वागत केले. प्रमोद जोशी, कारेकर यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. सलिम शेख, अॅड. परवेज पठाण, अॅड. संजय गायकवाड, अॅड. अजित पोतदार, विद्याधर कावडे, गुरूदत्त म्हाडगुड, वसंत लिंगनूरकर आदी उपस्थित होते. अध्यापकर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com