पानसरे स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रम

पानसरे स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रम

L81839
...

कॉ. गोविंद पानसरे स्मृतिदिनानिमित्त
पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन

कोल्हापूर, ता. १०ः कॉ. गोविंद पानसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त १६ ते २० फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे कॉ. गोविंद पानसरे स्मृतिजागर समितीच्या आज झालेल्या बैठकीत ठरवण्यात आले. मोर्चा, मॉर्निंग वॉक, बैठका, ग्रामीण भागात सभा, शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन, ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे वाटप, व्याख्यान आणि व्यापक स्मृतिजागर सभा यांचा त्यामध्ये समावेश आहे.
पानसरे यांच्या हत्येस आठ वर्षे पूर्ण होत असून या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्यामध्ये विविध पुरोगामी राजकीय पक्ष, सामाजिक व सांस्कृतिक संघटना, कॉ. पानसरे यांचे स्नेही सहभागी होत आहेत. आठ वर्षे न्यायासाठी संघर्ष सुरू असूनही अद्याप खुनी आणि सर्व सूत्रधार पकडण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत. त्याचा निषेध आणि समाजातील लोकशाहीविरोधी वातावरणाबद्दल जागृती करण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. लवकरच ते जाहीर करण्यात येईल.
बैठकीला दिलीप पवार, मेघा पानसरे, सतीशचंद्र कांबळे, सुभाष जाधव, बाबूराव कदम, अतुल दिघे, अनिल लवेकर, बाबूराव तारळी, राजेश वरक, कृष्णात कोरे, रसिया पडळकर, रघुनाथ कांबळे, संभाजी जगदाळे, इस्माईल सय्यद आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com