गोवा बनावटीची दोन कोटींची दारू इन्सुलीत जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोवा बनावटीची 
दोन कोटींची दारू
इन्सुलीत जप्त
गोवा बनावटीची दोन कोटींची दारू इन्सुलीत जप्त

गोवा बनावटीची दोन कोटींची दारू इन्सुलीत जप्त

sakal_logo
By

इन्सुली तपासणी नाका ः येथे शुक्रवारी रात्री केलेल्या कारवाईत उत्पादन शुल्क पथकाने दोन कोटींची दारू जप्त केली. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

गोवा बनावटीची
दोन कोटींची दारू
इन्सुलीत जप्त
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ११ ः गोवा बनावटीच्या दारूची मुंबईकडे बेकायदा वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ पथकाने कारवाई करत एक लाख ४४ हजार दारूच्या बाटल्या जप्त केल्या. त्याची किंमत एक कोटी ८७ लाख २० हजार रुपये होते. त्याशिवाय २५ लाखांचा कंटेनर व इतर मुद्देमाल १२ हजार, असा एकूण तब्बल दोन कोटी १२ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आजअखेरची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
दारूची बेकायदा वाहतूक होणार असल्याची माहिती कुडाळ पथकाला मिळाली होती. त्यानुसार गेले काही दिवस पथक करडी नजर ठेवून होते. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी इन्सुली तपासणी नाका येथे वाहन (एमएच १२ एलटी ७६१७) आले. तपासणीत सुमारे तीन हजार खोकी सापडली. पथकाने वाहनचालक संशयित राजशेखर सोमशेखर परगी (वय ४१, रा. मारुती सर्कल नेकारनगर हुबळी), त्याचा सहायक रहमतुल्लाह कासीम खान (४१, रा. कल्लमानगर, यल्लापूर, कर्नाटक) अशा दोघांना वाहनासह ताब्यात घेतले.
विभागाचे अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ निरीक्षक अमित अशोक पाडाळकर यांनी केली. निरीक्षक संजय मोहिते, तपासणी नाका इन्सुली, दुय्यम निरीक्षक राहुल भीमराव मोरे, सहायक दुय्यम निरीक्षक रमाकांत धोंडी ठाकूर, जवान एच. आर. वस्त, शरद मनोहर साळुंखे, संदीप कदम यांनी कारवाईत सहभाग घेतला.