शिवजयंती तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवजयंती तयारी
शिवजयंती तयारी

शिवजयंती तयारी

sakal_logo
By

82094
कोल्हापूर : शिवजयंतीसाठी मिरजकर तिकटी येथे मावळा कोल्हापूरतर्फे ‘प्रतापगडचा रणसंग्राम’ या महानाट्यासाठी उभारण्यात येत असलेले स्टेज.

शिवजयंतीसाठी अवघे शहर सज्ज
महानाट्यासह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : यंदाच्या शिवजयंतीसाठी अवघे शहर सज्ज झाले आहे. शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळातर्फे उभा मारुती चौकात शौर्यपीठ उभारले जात असून, मिरजकर तिकटी येथे मावळा कोल्हापूरतर्फे ‘प्रतापगडचा महासंग्राम’ महानाट्याची जय्यत तयारी सुरू आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदा १९ फेब्रुवारीला शिवजयंती धुमधडाक्यात साजरी करण्याचे वेध शिवप्रेमींना लागले आहेत. शहरातील गल्ली-बोळांसह उपनगरात त्याची तयारी सुरू झाली आहे.
शिवछत्रपतींच्या अश्‍वारूढ, सिंहासनारूढ पुतळ्यांची ठिकठिकाणी विक्री सुरू झाली असून, भगव्या ध्वजांसह पताकांची शिवप्रेमींकडून खरेदी केली जात आहे. त्याचबरोबर शिवछत्रपतींच्या पराक्रमाचा धगधगता इतिहास भावी पिढ्यांना कळावा, या उद्देशाने युवक सरसावले आहेत. त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित नाटकाच्या तालमी सुरू आहेत. शिवकालीन युद्धकला पथकांना प्रात्यक्षिके सादर करण्यासाठी सुपाऱ्या येत आहेत. त्यांचाही जोरदार सराव सुरू आहे.
शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळातर्फे पोवाडे, व्याख्यानांचे आयोजन केले आहे. शिवजयंतीदिवशी पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरजकर तिकटीवरील मावळा कोल्हापूरतर्फे ‘वारसा विचारांचा...कृती जाणिवतेची,’ या विचारधारेतून शिवरायांच्या विचारांचा जागर घातला जाणार आहे. १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान सायंकाळी साडेसहा ते साडेअकरापर्यंत ‘प्रतापगडचा महासंग्राम’ महानाट्य सादर केले जाणार आहे.