इचल : लोकअदालत

इचल : लोकअदालत

इचलकरंजीत लोकअदालतीत
३६१ प्रकरणे निकाली

इचलकरंजी : येथील न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ३६१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून तब्बल ५ कोटी ६८ लाख रुपयांची वसुली करण्यात आली. लोकअदालतीसाठी ६ पॅनेल होते. येथील जिल्हा न्यायालयात हातकणंगले तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश एम. आर. नेरलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालत झाली. लोकअदालतमध्ये दाखलपूर्व प्रकरणातील १५२ आणि न्यायालयात प्रलंबित प्रकरणांपैकी २०९ प्रकरणे निकाली काढली. त्यातून ५ कोटी ६८ लाख रुपयांची वसुली झाली. लोकअदालत यशस्वी करण्यासाठी पॅनेलवरील न्यायाधीश, इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज चुडमुंगे, उपाध्यक्ष अ‍ॅड. दत्तात्रय लटके, सचिव अ‍ॅड. राजीव शिंगे यांसह सदस्य, न्यायालयीन कर्मचारी, पक्षकारांचे सहकार्य लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com