लिंगनूर शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लिंगनूर शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश
लिंगनूर शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश

लिंगनूर शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश

sakal_logo
By

82205
कोल्हापूर : जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचे पारितोषिक लिंगनूर शाळेच्या विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांनी स्वीकारले.

लिंगनूर शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश
गडहिंग्लज : लिंगनूर कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत यश मिळविले. मोठ्या गटात समूहगीत गायन स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकाविला. तर लहान गटात समूहनृत्य स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळविला. अर्चना देसाई व शरद देसाई यांनी मार्गदर्शन केले. कृष्णा होरांबळे, अंकूश सावंत, निलेश अस्वले यांच्या वाद्यवृंदाची साथ लाभली. मुख्याध्यापक मधुकर जरळी, मधुकर कामडे, निर्मला गुरव, सुजाता भोपळे, योगिता पाटील कांबळे यांचे सहकार्य मिळाले.
------------
साधनाच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा
गडहिंग्लज : येथील साधना प्रशालेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. प्राचार्य जी. एस. शिंदे अध्यक्षस्थानी होते. संचालक अरविंद बारदेस्कर, संजय घोडके, शिंदे, पर्यवेक्षक रफिक पटेल यांच्यासह शालोम बारदेस्कर, सृष्टी पाटगावे, काव्यांजली पोळ, श्रावणी जाधव, जिया मुल्ला, शिवप्रसाद कोळी, अमेय सुतार, कस्तुरी भाग्यवंत या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. प्रशांत बैरागी, निलोफर शेख, जोसेफ नरोना, रवींद्र पोतदार, आर. सी. हिरेमठ, विनय नाईक, पी. के. हरेर, रिक्सन रॉड्रिक्स, दिलीप अडसुळे, एस. बी. हरळीकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. शीतल हरळीकर यांनी स्वागत केले. स्मित पाटोळेने सूत्रसंचालन केले. जोसेफ नोरोन्हा यांनी आभार मानले.