
भूसंपादनाच्या सहा दाव्यांमध्ये तडजोड
GAD126.JPG
82268
गडहिंग्लज : लोकअदालतीत तडजोड झालेल्या प्रकरणातील वादी व प्रतिवादीसोबत न्या. ओंकार देशमुख यांच्यासह वकील, कर्मचारी उपस्थित होते.
--------------------------------------------------------------------
भूसंपादनाच्या सहा दाव्यांमध्ये तडजोड
गडहिंग्लजला लोकअदालत : १२८ प्रकरणातून एक कोटीची वसूली
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ : येथील तालुका विधी सेवा समितीतर्फे झालेल्या लोकन्यायालयात भूसंपादन भरपाई संदर्भातील सहा दाव्यांमध्ये तडजोड झाली. या लोकन्यायालयात दाखल व दाखलपूर्व अशा १२८ प्रकरणांमधून १ कोटी १६ हजार रुपयांची तडजोडीने वसूल झाले.
अतिरिक्त जिल्हा व दिवाणी न्यायालयात ही लोक अदालत झाली. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश ओंकार देशमुख, दिवाणी न्यायाधीश जी. व्ही. देशपांडे व सहदिवाणी न्यायाधीश एस. ए. राठोड यांच्या नेतृत्वाखालील तीन पॅनेलसमोर ही लोक अदालत चालली. न्या. देशमुख यांच्या पॅनेलसमोरील १६ न्यायप्रविष्ठ प्रकरणांमध्ये ५५ लाख ५ हजार रुपये तडजोडीने निकाली झाली. न्या. देशपांडे यांच्याससमोर ७ न्यायप्रविष्ठ तर ७२ दाखलपूर्व प्रकरणामध्ये २३ लाख ६० हजार तर न्या. राठोड यांच्यासमोर न्यायप्रविष्ठ ३३ प्रकरणांमध्ये तडजोड होवून २१ लाख ५० हजार रुपयाच्या वसूलीचे निकाल झाले. तीनही पॅनेलद्वारे दाखल व दाखलपूर्व अशा १२८ प्रकरणामध्ये १ कोटी १६ हजाराच्या वसूलीचे निकाल झाले.
या लोकअदालतीसाठी अॅड. शीतल साळवी, अॅड. आदिती बापट, अॅड. नुसरत पाटील-इनामदार, सहायक अधीक्षक संजय साळुंखे, अजित पाटील, अस्मिता डांगे, राजू पाटील, प्रदीप पाटील, रवींद्र घायतडक, आनंदा वणीरे, एस. एस. उंडाळे, तानाजी पाटील, विनोद भिलारे, पी. जी. मेटकुप्पी, शीतल केर्लीकर, भास्कर पाटील, अमित रेडकर, संदीप काकडे आदींचे सहकार्य मिळाले.