
दुधवडकर
L82301
..
विश्वासघात करणाऱ्यांना
गाडून भगवा फडकवा
दुधवडकर : ३४ शाखाप्रमुखांना निवडीचे पत्र
कोल्हापूर, ता. १२ ः ‘पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात करून जे निघून गेले, त्यांना गाडून शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज रहा’, असे आवाहन संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी केले.
शिवसेना उपशहर प्रमुख व शाखा प्रमुख यांची आढावा बैठक आज शासकीय विश्रामगृहावर झाली. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. शहरातील ३४ शाखा प्रमुखांना निवडीचे पत्र देण्यात आले. उत्तर, दक्षिण, करवीर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व अंगीकृत संघटनांचे २४ नवीन पदाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले.
यावेळी दुधवडकर म्हणाले, ‘पक्षबांधणीचे काम प्रामाणिक व सक्षमपणे करा. शाखाप्रमुखांनी मुंबईच्या धर्तीवर काम करून गटप्रमुखांची संख्या वाढवावी. शाखा प्रमुख हा पक्षाचा पाया असतो. त्यांनी आपापल्या प्रभागातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे ब्रीद ठेवून काम करावे. शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. ज्यांनी विश्वासघात केला त्यांना आगामी महापालिका निवडणुकीत गाडण्यासाठी आतापासून कामाला लागा.’ यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, रविकिरण इंगवले यांनी मनोगत व्यक्त केले सुनील मोदी यांनी प्रास्ताविक केले.
जिल्हाप्रमुख विजय देवणे, हर्षल सुर्वे, मंजित माने, प्रतिज्ञा उत्तुरे, स्मिता सावंत, प्रीती क्षीरसागर, दीपाली शिंदे, कमलाकर जगदाळे, सुरेश पोवार, उदय सुतार, प्रशांत पोवार, किशोर दाभाडे, विशाल सूर्यवंशी, अवधूत साळोखे, शशिकांत बिडकर आदी यावेळी उपस्थित होते.
...
वेड्यांच्या दवाखान्याची व्यवस्था करा
‘ज्या चाळीस लोकांनी गद्दारी केली ते काही दिवसांनी वेडे होणार आहेत. त्यामुळे त्यांना वेड्यांच्या दवाखान्यांची खरी गरज आहे. त्यांच्यासाठी येथे वेड्यांच्या दवाखान्याची व्यवस्था करून ठेवा’, असा टोला दुधवडकर यांनी लगावला.