
तरुणांनी व्यवसायातून स्वावलंबी व्हावे
gad1210.jpg
82328
गडहिंग्लज : बांधकाम कामगारांना समरजित घाटगे यांच्या हस्ते सुरक्षा संच वाटप झाले. यावेळी गणपतराव डोंगरे, भाऊ कांबळे, संजय पोवार, शैलेंद्र कावणेकर आदी उपस्थित होते.
--------------------------------------------------
तरुणांनी व्यवसायातून स्वावलंबी व्हावे
समरजित घाटगे : कौलगेत सुरक्षा संच, आयुष्यमान कार्डचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ : ‘तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाच्या माध्यमातून स्वत:च्या पायावर उभे राहावे. छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचा वंशज म्हणून तरुणांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्नशील आहे,’ असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केले.
कौलगे (ता. गडहिंग्लज) येथे बांधकाम कामगारांना सुरक्षा संच, आयुष्यमान व आभा कार्डच्या वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. श्री. घाटगे म्हणाले, ‘शासनाच्या विविध योजनांचा लाभ गटतट न पाहता थेट लाभार्थीपर्यंत पोहचवण्यासाठी कटिबद्ध आहे.’ जिल्हा परिषद माजी सदस्य गणपतराव डोंगरे म्हणाले, ‘मागील निवडणुकीत डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या नेतृत्वाखाली घाटगे यांना चांगले मतदान दिले. आगामी विधानसभा निवडणुकीत विकासाच्या मुद्यावर घाटगे यांना निवडून देण्याचा जनतेने चंग बांधला आहे.’
सरपंच भाऊ कांबळे, रवींद्र घोरपडे, शैलेंद्र कावणेकर, आनंदा पाटील, सुनीता पाटील, आनंदराव देसाई, दीपाली वडर, सुषमा कांबळे, तेजस देसाई, ज्ञानदेव साठे, शिवाजी जाधव, अजित वडर, जयवंत चव्हाण, ज्ञानदेव सुतार, दयानंद अर्दाळकर, श्रीकांत चव्हाण, दत्ता मडकर, शंकर केसरकर, पांडुरंग कुपेकर, रेखा जाधव, अमोल पाटील, पद्मा कदम, सुजित चव्हाण, शकुंतला शिंदे, सरस्वती जाधव उपस्थित होते. रामचंद्र पोवार यांनी स्वागत केले. उपसरपंच संजय पोवार यांनी आभार मानले.