एसटीच्या चालक वाहकांना नियुक्तीपत्रे प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटीच्या चालक वाहकांना नियुक्तीपत्रे प्रदान
एसटीच्या चालक वाहकांना नियुक्तीपत्रे प्रदान

एसटीच्या चालक वाहकांना नियुक्तीपत्रे प्रदान

sakal_logo
By

82342
...

एसटीच्या ३८३ चालक-वाहकांना नियुक्तीपत्रे

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १२ : एसटी महामंडळाने २०१९ मध्ये चालक तथा वाहकपदी भरती प्रक्रिया राबविली होती. यामध्ये भरती झालेल्या ३८३ चालक - वाहकांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. उमेदवारांना या नियुक्तीपत्रांचे वाटप शनिवार पेठेतील शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात झाले.
वैशाली क्षीरसागर म्हणाल्या, ‘भरती प्रक्रियेमध्ये कोविड काळात पात्र उमेदवारांना वाहन चाचणी, वैद्यकीय तपासणीसाठी बोलविण्यात आले होते. मात्र, निवड झालेल्या ३८३ कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे दिली नव्हती. निवड झाली; पण नियुक्तीपत्र हातात नसल्याने उमेदवारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. याबाबत निवड झालेल्या उमेदवारांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची भेट घेतली होती. याबाबत त्यांनी दोन महिन्यांपूर्वी एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांशी बैठक घेऊन आढावा घेत, हा प्रश्न दोन महिन्यांत निकाली काढण्याची ग्वाही दिली होती. गेल्या दोन महिन्यांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याप्रश्‍नी मार्ग काढण्याबाबत मागणी केली होती. श्री. क्षीरसागर यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश आले.’
यावेळी विभागीय वाहतूक नियंत्रक उत्तम पाटील, शिवसेना महिला आघाडी महानगरप्रमुख मंगल साळोखे, उमेदवार बाबूराव कांबळे, रवींद्र कांबळे, राहुल वांद्रे, इंद्रजित डूम, संदीप पाटील, रणधीर कांबळे, शरद तळेकर उपस्थित होते.