Wed, June 7, 2023

अनोळखी मृतदेह
अनोळखी मृतदेह
Published on : 12 February 2023, 2:57 am
कडगावजवळ अनोळखी मृतदेह
गडहिंग्लज : कडगाव (ता. गडहिंग्लज) गावच्या हद्दीत आंबेओहोळ ओढ्याजवळ एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला आहे. पोलिसपाटील पुंडलिक चिकोडे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. मृतदेहाच्या हातावर कन्नड भाषेत अक्षरे कोरली आहेत. अंगात निळ्या- पांढऱ्या पट्ट्याचा टी शर्ट, काळ्या रंगाची फुल पँट, लाल रंगाचे बूट घातले आहेत.