कुंभी मुख्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुंभी मुख्य
कुंभी मुख्य

कुंभी मुख्य

sakal_logo
By

०३२२१
03217
०३२१०

‘कुंभी’साठी चुरशीने ८२.४५ टक्के मतदान

गेल्या निवडणुकीपेक्षा ३.६६ टक्क्याने घट; उद्या निकाल

सकाळ वृत्तसेवा
कुडित्रे, ता. १२ : कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी ८२.४५ टक्के मतदान झाले. मतदान केंद्रावर चुरशीने २३ हजार ४३१ पैकी १९ हजार ३१९ मतदारांनी आपला हक्क बजावला. मंगळवारी (ता. १४) कसबा बावडा रमणमळा येथे सकाळी ८ पासून ३५ टेबलांवर आणि ३ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.
आज (ता. १२) सकाळी आठपासून मतदानाला सुरुवात झाली. यंदाची निवडणूक चुरशीची असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. सकाळपासूनच मतदारांनी गर्दी केली होती. मतदान केंद्राबाहेर सत्ताधारूढ आणि विरोधी पॅनेलचे मोठे मंडप बांधले होते. येणाऱ्या प्रत्येक मतदाराचे स्वागत करत आपल्या पॅनेलला मतदान करण्याचे आवाहन केले जात होते. कोपार्डे, वाकरे, पाडळी खुर्द, कोगे, शिंगणापूर, कुडित्रे या ठिकाणी ईर्षेने मतदान झाले.
दरम्यान, कोपार्डे (ता. करवीर) येथील स. ब. खाडे महाविद्यालयात सकाळी ९ ला सत्ताधारी नरके पॅनेलचे प्रमुख अध्यक्ष माजी आमदार चंद्रदीप नरके, तर विरोधी राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनेलचे प्रमुख व गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील, त्यानंतर गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, कुंभी बँकेचे अध्यक्ष अजित नरके, जिल्हा परिषद माझी अध्यक्ष राहुल पाटील यांनी मतदान केले. दुपारी याच ठिकाणी गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांनी मतदान केले, यावेळी चेतन नरके यांनी भेट दिली. सकाळी १० पर्यंत ५ हजार ५७९ म्हणजेच २३ टक्के मतदान झाले. दुपारी बारापर्यंत ११ हजार ९५३ (५१ टक्के), तर ४ पर्यंत १८ हजार ८००, तर सायंकाळी ५ पर्यंत १९ हजार ३१९ असे ८२.४५ टक्के मतदान झाले. गेल्या पंचवार्षिक मध्ये ८६.११ टक्के, १९७२७ मतदान झाले होते. यावेळी ३.६६ ने मतदानाचा टक्का घसरला.
२३ जागांसाठी माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी नरके पॅनेलमधून २३ उमेदवार, तर विरोधी राजर्षी शाहू कुंभी बचाव पॅनेलमधून गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली २३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गेले पंधरा दिवस कार्यक्षेत्रात प्रचाराचा धुरळा उडाला होता. कारभारावरून आरोप-प्रत्यारोप केले गेले.

- सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान झाले
- संस्था गटात ३२६ ठराव प्राप्त
...

चौकट..
३२६ मतदान वाढणार
संस्था गटातील मतदारांना पाच मतांचा अधिकार होता. यावेळी २३ मतांचा अधिकार झाला आहे. त्यामुळे, सर्वसाधारण १८ उमेदवारांना ३२६ मतदान वाढणार आहे.

चौकट
पाच नव्हे २३ मते
गत निवडणुकीत संस्था गटांत पाच मतांचा अधिकार होता. यावेळी या गटात फक्त पाच मते द्यावी लागतील, असा समज मतदारांचा होता. पण केंद्र अधिकाऱ्याकडून २३ मते असल्याचे सांगताच मतदार चक्रावले. हे आधी निवडणूक प्रशासनाकडून सूचित का करण्यात आले नाही, असा प्रश्न मतदार उपस्थित करत होते. संस्था गटात वाढलेल्या ३२६ मतदानाचा फायदा कोणाला होणार, हे मतदान महत्त्वाचे ठरणार आहे.

चौकट
बनावट मतदानासाठी सतर्क
पन्हाळा गट क्रमांक चार व पाच मध्ये मयत मतदारांचे बनावट मतदान होऊ नये, यासाठी एका गटाने मयत उमेदवारांच्या याद्या बूथवर पोहोच केल्या होत्या. यावेळी कार्यकर्ते सतर्क राहून मतदान प्रक्रिया पार पडली.
-----------------------------------------------------------------------------------
भानामतीच्या संशयावरून मारहाण
शनिवारी (ता. ११) मध्यरात्री दीड वाजता बाळासाहेब खाडे यांच्या घरासमोर भानामतीचा प्रकार करणारा युवक सापडला. कार्यकर्त्यांनी त्याला पकडून चोप दिला. त्याने आपले नाव सांगून कोणत्या पॅनेलच्या वतीने असे केले असल्याचा खुलासा केला. त्यानंतर बाळासाहेब खाडे यांनी या युवकाला कार्यकर्त्यांच्या तडाख्यातून सुखरूप बाहेर पाठवले. या प्रकाराचा व्हिडिओ दिवसभर व्हायरल होत होता.
--------------------------
समर्थकांचे दावे-प्रतिदावे
खुपिरे येथे शाहू आघाडीच्या वतीने सभासद एकत्र करून शक्ती प्रदर्शन करत रॅली काढून मतदान केंद्रावर आले होते, ४०० सभासद असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला. येथे ९३२ मतदान आहे. यामध्ये मयत १४० असून, एकूण ७८३ मतदान झाले. याबाबत सत्ताधारी उमेदवार यांच्याशी संपर्क साधला असता आम्हाला किती मतदान पडणार, हे निकालातच कळेल की अशी प्रतिक्रिया दिली.
-----------------------
मतपेटीवरून कार्यकर्त्यांची तारांबळ
वाकरे येथे मतदान झाल्यानंतर मतपेटी एका एसटीमधून एकच मतपेटी कर्मचारी घेऊन जात असताना, शाहू आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. गाड्या पाठवून रमणमळा इथेपर्यंत कार्यकर्ते एसटी बरोबर गेले. शंका नसावी, यासाठी खासगी सुरक्षारक्षक बोलवून चार कार्यकर्ते मतपेटी स्ट्रॉंग रूम बाहेर थांबल्याचे समजते.
-----------------------------
पन्हाळ्यात लीड घेणार काय?
गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीमध्ये करवीर तालुक्यातून विरोधी शाहू पॅनेलला मताधिक्य मिळाले होते. पन्हाळ्यामध्ये ते मताधिक्य कमी होऊन नरके पॅनेलचा विजय होत होता. यावेळी पन्हाळ्यातून आमदार विनय कोरे विरोधी आघाडीबरोबर आहेत. यावेळी करवीरमधून शाहू आघाडीने घेतलेल्या मताधिक्याचा पन्हाळ्यातून नरके पॅनेल टप्पा पूर्ण करून विजयी होणार का? याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.
---------------------------------------------------
निवडणूक कारखान्याची, चर्चा लोकसभेची
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी चेतन नरके इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी विरोधी आघाडीला मदत केली अशी चर्चा असून, अरुण नरके यांची भूमिका विरोधी आघाडीला विजयी करणार का? खासदारकीचे गणित मांडून चेतन नरके यांचे गणित सुटणार का? हे कुंभीच्या निकालावर ठरणार का? असे प्रश्न उपस्थित होत होते.
-----------------------------------------
सतेज पाटील यांची भूमिका गुलदस्त्यात
माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी स. ब. खाडे महाविद्यालय येथे मतदान केले आणि मांडुकली येथे सर्वसाधारण गटातून मतदान केले. त्यांनी उघडपणे नरके पॅनेलला पाठिंबा दर्शविला नाही. मात्र, करवीर आणि गगनबावडा तालुक्यातील शाहू आघाडीचे कार्यकर्ते सोडून, उर्वरित कार्यकर्ते नरके पॅनेलला मतदान करणार का? असा प्रश्न आहे. शाहू आघाडीमध्ये सतेज पाटील यांचे कार्यकर्ते सक्रिय होते, त्यांनी पाटील यांचा शाहू आघाडीलाच पाठिंबा असल्याचा दावा केला.
------------------------------------
नव्या मतदारांची विरोधकांना धास्ती
कुंभी कारखान्यामध्ये चंद्रदीप नरके यांची एकहाती सत्ता आहे. यावर्षी शेअर्स विक्री केली असून, सुमारे दहा हजार मतदान वाढले आहे. हे मतदान या निवडणुकीत नसले, तरी पुढच्या निवडणुकीत असेल. यामुळे पुढची निवडणूक नरके पॅनेलच्या हातात असेल. या भीतीने विरोधी आघाडीने कंबर कसली होती.
---------------------------------------
दोन कारखान्यांचे राजकारण
माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी काँग्रेस प्रणीत शाहू आघाडी असताना शाहू आघाडीला पाठिंबा का दिला नाही, राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत आमदार पी. एन. पाटील यांनी साथ द्यावी, अशी त्यांची भूमिका होती का? याबाबत आमदार पाटील यांनी कोणतेही वक्तव्य न केल्यामुळे सतेज पाटील यांनी नरके पॅनेलला सपोर्ट केला, अशी चर्चा आहे.
---------------------------
कार्यकर्त्यांचे दावे आणि पैजा
आमचा पारदर्शी कारभार आहे, सभासदांचा विश्वास आहे, संपूर्ण २३ उमेदवार विजयी होतील, असा दावा नरके पॅनेलच्या वतीने केला जात आहे; तर विरोधी आघाडीच्या वतीने कुंभी कारखान्यात एकाधिकारशाही आहे, कारखाना आर्थिक अडचणीत आहे, कारखान्याचे खासगीकरण होईल, ते होऊ देणार नाही, यासाठी सभासद आमच्याबरोबर आहेत, असे म्हणत आमचे २३ उमेदवार विजयी होतील, असा दावा विरोधी शाहू आघाडीने केला आहे. तसेच दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांच्यात विजयासाठी पैजा लागल्या आहेत. आता नाही तर कधी नाही, या उद्देशाने दोन लोकप्रतिनिधींनी एका गटाला एक खोका आर्थिक रसद पुरवली. विजयासाठी साम-दाम-दंडचा वापर केला, अशी चर्चा आहे.
-------------------------
ग्रामपंचायतीचा बदला, जि.प.ची पेरणी
झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा वचपा एका गटाने दुसऱ्या गटावर या कुंभी निवडणुकीत काढण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, लोकसभा निवडणुकीची बीजे पेरली गेली आहेत.
००००००००
चौकट ठळक वापरणे
ुफोटो - 82377
सतेज पाटील, चंद्रदीप नरके एकत्र
कुंभीच्या निवडणुकीत विरोधी आघाडीला आमदार पी. एन. पाटील यांनी जाहीर पाठिंबा देऊन सूत्रे हलवली होती. त्यानंतर काही दिवसांत सत्तारूढ नरके पॅनेलला आमदार सतेज पाटील यांनी पाठिंबा दिल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर झळकल्या होत्या. सतेज पाटील यांनी आपली अधिकृत भूमिका जाहीर केली नसली, तरीही त्यांचे कायकर्ते प्रचारामध्ये अग्रेसर होते. गावागावांत सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी नरके यांच्या बाजूने यंत्रणा गतिमान केली होती. आज निवडणुकीच्या दिवशी सतेज पाटील यांनी कोपार्डे येथील स. ब. खाडे महाविद्यालय येथे संस्था गटातून मतदान केले. यावेळी चंद्रदीप नरके यांच्यासोबतच ते मतदान केंद्रावर आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. बघता बघता हा दोन्ही नेते एकत्र आलेला व्हिडिओ सोशल मीडियावर फिरू लागला. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांनी आपल्यालाच मतदान करावे, यासाठी सर्वच उमदेवारांनी प्रयत्न केला.