सभापती निवड

सभापती निवड

82438, 82439

महानगरपालिका प्राथमिक शिक्षक
पतसंस्थेच्या सभापतिपदी जमादार

कोल्हापूर, ता. १३ ः कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या सभापतिपदी उमर जमादार यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापतिपदी कुलदीप जठार, सचिवपदी सुधाकर सावंत व खजानिसपदी संजय पाटील यांची बहुमताने निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. एम. तोडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नूतन संचालकांच्या बैठकीत निवडी करण्यात आल्या. सभेस संचालक वसंत आडके, राजेंद्र गेंजगे, लक्ष्मण पोवार, भारती सूर्यवंशी, मनीषा पांचाळ, विजय माळी, प्रदीप पाटील, विजय सुतार, नेताजी फराकटे, विलास पिंगळे, प्रभाकर लोखंडे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com