प्रा. कुराडे यांच्या दोन ग्रंथांना पुरस्कार

प्रा. कुराडे यांच्या दोन ग्रंथांना पुरस्कार

gad135.jpg
82477
कोल्हापूर : दोन ग्रंथांना मिळालेला पुरस्कार प्रा. किसनराव कुराडे यांनी स्वीकारला. यावेळी अरुण पाटील, अरुण शिंदे, रा. तु. भगत, शामराव कुरळे आदी उपस्थित होते.
------------------------------------------------------------------
प्रा. कुराडे यांच्या
दोन ग्रंथांना पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १३ : शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष व साहित्यिक प्रा. किसनराव कुराडे यांच्या सत्यशोधक महात्मा बसवेश्वर व स्वयंभू यशवंतराव घाटगे संस्थानिक शाहू महाराज झाले नसते तर .... या दोन संशोधन ग्रंथांना करवीर साहित्य सभेच्या वतीने पुरस्कार देऊन गौरवले.
संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात पुरस्कार वितरण झाले. रयत शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक उद्योगपती एम. बी. शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. अरुण शिंदे व डॉ. अरुण पाटील यांनी धर्मग्रंथ, धर्मसंस्थापक आणि भूतकाळातील ऐतिहासिक कर्तबगार व्यक्ती यांच्या जीवन कार्याकडे पाहताना अंधश्रध्देच्या आहारी न जाता वास्तवतेच्या दृष्टिकोनातून लिखाण झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यादृष्टीने प्रा. कुराडे यांनी बसवेश्वरांच्या क्रांतिकारक कार्याचा संशोधित ग्रंथामध्ये शोध आणि वेध घेतला असून, स्वयंभू घाटगे संस्थानिक शाहू महाराज झाले नसते तर या ग्रंथांत त्यांनी वास्तव चित्रण केलेले आहे. त्यामुळेच एकावेळी त्यांच्या दोन्हीही ग्रंथांचा करवीर साहित्य परिषदेने यथोचित गौरव झाल्याचे त्यांनी सांगितले. संत गाडगेबाबा प्रतिष्ठानचे संस्थापक रा. तू. भगत यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय प्राचार्य दिनकरराव पाटील यांनी करून दिला. वाचन कट्टाचे संस्थापक युवराज कदम, करवीर साहित्य सभेचे कार्याध्यक्ष शामराव कुरळे, प्राचार्य माळी, डॉ. सरोज बिडकर यांच्यासह राज्यातील लेखक उपस्थित होते. करवीर साहित्य सभेचे कोषाध्यक्ष एम. डी. देसाई यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com