घरफाळा भरणार नाही

घरफाळा भरणार नाही

घरफाळा वाढवल्यास
कर भरणार नाही

उज्ज्वल कोल्हापूर संघटनेचा इशारा

कोल्हापूर, ता. १३ ः महापालिकेने आर्थिक तूट भरून काढण्यासाठी घरफाळा वाढीचा प्रस्ताव तयार केलेला आहे. मात्र, वाढ करून कर बुडव्यांना व थकबाकीदारांना अभय देण्याचा कुटिल डाव दिसून येत आहे. त्यामुळे घरफाळा वाढवल्यास शहरवासीय कर भरणार नाहीत, असा इशारा उज्ज्वल कोल्हापूर संघटनेने निवेदनाद्वारे महापालिकेला दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे, महागाईमुळे नागरिक त्रस्त आहेत. करवाढीमुळे जनतेचे कंबरडे मोडेल. धनदांडग्यांनी कोट्यवधीची बिले थकविली असून, त्यांना सवलत दिली जात आहे. विभागातील अधिकारी, कर्मचारी, माजी नगरसेवक, आमदार, खासदारांनी प्रशासनाचा कर भरलेला आहे का? त्यांची निःपक्षपातीपणाने कारवाई करावी. घरफाळा बुडविलेला किंवा थकविलेला आहे त्यांच्याकडून वसूल करू शकत नसल्यामुळे करवाढीचा भार टाकत आहे का? अनेक मिळकतींना घरफाळा लागूच केलेला नाही. त्यामुळे वाढ करून शहराच्या कोणता विकास करणार आहे. याचा खुलासा प्रशासनाने करावा. गणेश लाड, अजित पाटील, परवेज पठाण, अभिजित कदम, निवास भोसले यांनी निवेदन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com