Wed, May 31, 2023

लमान समाज
लमान समाज
Published on : 13 February 2023, 1:54 am
लमान समाजाचा
उद्या मेळावा
कोल्हापूर ः मानवतावादी शिकवण देणारे संत सेवालाल महाराज यांच्या उद्या (ता. १५) होणाऱ्या जयंतीचे औचित्य साधून लमान समाज विकास संघातर्फे बुधवारी (ता. १५) जिल्हास्तरीय लमान समाज मेळाव्याचे आयोजन केले आहे. सकाळी ११ वाजता शाहू स्मारक भवनमध्ये हा मेळावा होईल.
संत सेवालाल यांची सत्य खरा धर्म आहे, नेहमी सत्याचे आचरण करावे, अशी शिकवण होती. त्यांच्या या विचारांचा जागर व्हावा व जिल्हाभर विखुरलेला लमान समाज जयंतीनिमित्त एकत्र यावा, यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला समाजातील लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष रामचंद्र पवार, संतोष राठोड, सुनील राठोड यांनी केले.