आवश्यक- संक्षिप्त

आवश्यक- संक्षिप्त

82532
डॉ. देशिंगकर यांना रोटरी जीवनगौरव पुरस्कार
कोल्हापूर ः येथील कर सल्लागार, माजी रोटरी गव्हर्नर, लेखक डॉ. वासुदेव देशिंगकर यांना नुकत्याच बेळगाव येथे झालेल्या रोटरी जिल्हा ३१७० च्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये रोटरी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘रोटरी’चा हा बहुमान मिळणारे कोल्हापुरातील ते पहिलेच रोटरी सदस्य आहेत. डॉ. देशिंगकर गेली ४५ वर्षे ‘रोटरी’च्या माध्यमातून कार्यरत असून, यापूर्वीही अनेक संस्थांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. विविध सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत. बेळगाव येथे झालेल्या या स्नेहसंमेलनात कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतून दोन हजारांहून अधिक रोटरी सदस्य उपस्थित होते.
..........
82534
प्रसाद जाधवच्या उपकरणाची निवड
कोल्हापूर ः वाठार (ता. हातकणंगले) येथे झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनातून पारगाव येथील पाराशर हायस्कूलच्या प्रसाद जाधवच्या उपकरणाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. दिव्यांग गटातून त्याने प्रदर्शनात स्मार्ट हेल्मेट हे उपकरण सादर केले. हेल्मेट घातले तरच वाहन सुरू होते, अशा प्रकारचे हे उपकरण आहे. त्याच्या या यशाबद्दल आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या हस्ते सत्कार झाला. त्याला अभय शेलार, विनायक मेथे, स्वाती कोकितकर, विनायक कोकितकर, बी. जी. करवडे, प्राचार्य एस. वाय. काटे यांचे मार्गदर्शन लाभले.
..............
व्हॅलेंटाईन डेनिमित्त आज रक्तदान शिबिर
कोल्हापूर ः व्हॅलेंटाईन डेनिमित्त उद्या (मंगळवारी) युवा ऑर्गनायझेशनतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. प्रेमोत्सव साजरा करतानाच तरुणाईमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने गेली सतरा वर्षे युवा ऑर्गनायझेशनच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा पाचशे बाटल्या रक्त संकलनाचे उद्दिष्ट आहे. राजारामपुरीतील राजाराम गार्डन येथे दिवसभर शिबिर सुरू राहणार असून, इच्छुकांनी रक्तदान करावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com