दगडाची घडई भाग ३

दगडाची घडई भाग ३

फोटो- 82189
-
लोगो- दगडाची घडई ः भाग ३
-

घडाईचे कौशल्य साकारते घराचं सौंदर्य

अमोल सावंत : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : कसलाही दगड आणला आणि घडविला असे होत नाही. तो दगड हाम, चौरस आकाराचाच असला तरच तो घडतो. अन्यथा तो घडई करताना कसाही दुभंगतो. पाथरवट, घडाईदार, गवंडी मिळून घडाईचे कौशल्य साकारतात. अखंड न थकता घडाई सुरु असते. मग घडलेला दगड घराचं अभिजात सौंदर्य चिरकाळ टिकवून ठेवतो.

हाम, चौरस दगड हा मुळातच टोप संभापूर किंवा जिथेकुठे खाणकाम सुरु आहे, तेथून येतो. सर्वप्रथम सुरुंगाच्या साह्याने जमिनीत असलेले दगड विलग होतात. मग विलग झालेले दगड हाम, चौरस पद्धतीने तयार केले जातात. हाम, चौरस दगडाचे वैशिष्ठ्य म्हणजे घराचा पाया, भिंत, कट्टी आदी ठिकाणी तो चपखलपणे घडईद्वारे बसविला जातो. या शिवाय देव-देवतांच्या मूर्ती, थडगे, व्हईन, घरातील देवळी, तुळस, पाटा, वरंवटा, जातं अशा उत्पादनांसाठी वापरला जातो. हाम, चौरस दगडाला सहजपणे डिझाईन करता येते, म्हणून पाथरवट या दगडांना विशेष प्राधान्य देतात.

चौकट
गवंडी काय करतो?
दगडाची घडाई करणाऱ्याला पाथरवट, घडाईदार असे म्हणतात. या कामाचाही समावेश गवंडी कामात होतो. घडवलेले दगड, सर्व प्रकारच्या विटा आदींची जुडाई करणे ही कामे जुडाईदार करतो. दर्जा भरणे, गिलावा करणे ही कामे गवंडी करतो. घडाईकामास कौशल्य लागते. जुडाईवर गवंडीकामाची मजबुती अवलंबून असते.

चौकट
छिन्न्यांचे प्रकार
घडाईस लागणारी मुख्य हत्यारे म्हणजे, निरनिराळ्या प्रकारच्या छिन्‍न्या, लोखंडी हातोडा, लोखंडी गुण्या होय. पिचर, चिरणी, टाकी, दात्री असे छिन्‍न्यांचे प्रकार आहेत. पिचरचे टोक १·५ सें.मी. लांबीचे चपटे असते. त्याची धार ०· ५ सें.मी. जाडीची म्हणजे बोथट असते. चिरणीचे टोक चपटेच पण धारदार असते. दात्रीच्या टोकास दाते असतात. टाक्या टोकदार, कमी-जास्त प्रमाणात अणकुचीदार असतात. निरनिराळ्या छिन्‍न्यांबरोबर दोन कि. ग्रॅ.पासून १० कि. ग्रॅ.पर्यंत वजनाचे लोखंडी हातोडे घडाईसाठी वापरतात. गुण्याचा उपयोग दगडाच्या बाजू काटकोनात आणण्यासाठी करतात. तसेच कोणतीही बाजू एका पातळीत घडवली गेली की, नाही हे पाहण्यासाठी करतात.

घडाईचे प्रकार
बुची, सडकीव, दात्री, माठीव किंवा बारीक टिचीव असे घडाईचे मुख्य प्रकार आहेत. पिचर व जाड टाकीने बुची घडाई करतात. सडकीव घडाईकरिता पिचर, चिरणी अन्‌ कमी-जास्त टोकदार टाक्या वापरून कमी-जास्त खरबरीतपणाची घडाई करतात. घडाई करताना दगडावर साधारणपणे समांतर रेषा उमटतील अशी घडाई करतात. या रेषा उभ्या, आडव्या किंवा तिरप्या ठेवून घडाईचे प्रकार करतात. दात्री वापरून घडाई करतात, तेव्हा दगडावर जास्त ठळक, नागमोडी रेषा उमटतात. माठीव किंवा बारीक टिचीव घडाईकरिता बारीक अणकुचीदार छिन्‍न्या वापरून खड्डे नाहीसे करतात.
...
कोट
दगड पाहिल्यानंतर तो कसा घडवायचा हे आम्ही ठरवितो. त्यानुसार दगडांवर छिन्नी, हातोडा, ग्रायंडरद्वारे डिझाईन कोरली जाते. अगदी दर्शनी भिंत, मागील भिंतीमधील देवळ्या, दगडी चौकटीवरी डिझाईन जशी हवी तशी आम्ही करुन देतो. डिझाईनमध्ये देवतांच्या मूर्ती, फुले, भूमितीय आकृत्तींचा समावेश असतो. डिझाईन कारण म्हणजे, घराची रचना सर्वांगसुंदर व्हावी, हा हेतू असतो.
-मारुती पाथरवट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com