माई ह्युंडाई बहुमान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माई ह्युंडाई बहुमान
माई ह्युंडाई बहुमान

माई ह्युंडाई बहुमान

sakal_logo
By

82569

सिडनीतील परिषदेत
तेज घाटगे यांचा गौरव

माई ह्युंदाईच्या रौप्यमहोत्सवी वर्षात बहुमान

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथे झालेल्या ह्युंदाई डीलर्स परिषदेमध्ये माई ह्युंदाईचे व्यवस्थापकीय संचालक तेज घाटगे यांचा ह्युंदाई मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक अनसू किम आणि मुख्य कार्यपालन अधिकारी तरुण गर्ग यांच्या हस्ते गौरव झाला. माई ह्युंदाईच्या रौप्यमहोत्सवी वर्षात यानिमित्ताने आणखी एक बहुमान मिळाला. यावेळी माई ह्युंदाईचे संचालक दिग्विजय राजेभोसले, सरव्यवस्थापक विशाल वडेर, सतीश पाटील उपस्थित होते.
माई ह्युंदाईची स्थापना १९९८ मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर झाली. घाटगे ग्रुपचा वाहतूक व्यवसायातील प्रदीर्घ अनुभव, ग्राहकाभिमुख सेवा व त्यांचं देशभर असलेला विस्तार लक्षात घेऊन ह्युंदाई मोटर्सने घाटगे ग्रुपला ह्युंदाई कार्सची डीलरशिप दिली. कोल्हापुरातील माई ह्युंदाईची कामगिरी लक्षात घेऊन नंतर सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी माई ह्युंदाईला अधिकृत विक्रेते म्हणून ह्युंदाई मोटर्सने कार विक्रीसाठी नेमणूक केली. २५ वर्षांत सर्वोत्तम ग्राहक सेवेच्या पाठबळावर माई ह्युंदाईने विभागीय, तसेच राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार पटकावले आहेत.
सत्काराला उत्तर देताना तेज घाटगे यांनी माई ह्युंदाईच्या ७० हजारांहून अधिक ग्राहकांचे विशेष आभार मानले. माई ह्युंदाईच्या विस्तारात ग्राहकांचा सिंहाचा वाटा आहे. ग्राहकांकडून वेळोवेळी मिळणारा फीडबॅक आमच्या कामात सुधारणा करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि यातून ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी माई ह्युंदाईचे सर्व अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करतात. त्याचाच परिणाम म्हणजे माई ह्युंदाईचा सतत वाढणारा समाधानी ग्राहक वर्ग आहे. रोजच्या व्यवसायाशिवाय अनेक सामाजिक उपक्रमात माई ह्युंदाईचा सहभाग असतो. पाण्याची बचत, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, कोरोना काळातील कोविड केअर सेंटर ही काही उदाहरणे यानिमित्ताने देता येतील, असेही त्यांनी सांगितले.