पूररेषा निधी-सतेज पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पूररेषा निधी-सतेज पाटील
पूररेषा निधी-सतेज पाटील

पूररेषा निधी-सतेज पाटील

sakal_logo
By

लाल व निळी पूररेषा
सीमांकनासाठी २२ लाखांचा निधी

सतेज पाटील ः पंचगंगेच्या तीरावरील गावांना कळणार पूररेषा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १३ ः पंचगंगेला येणाऱ्या पुरातून बाधित होणारे क्षेत्र आणि सुरक्षित क्षेत्र याचे सीमांकन केले जाणार आहे. वरणगे पाडळी (प्रयाग) ते रुकडी या दरम्यान पंचगंगा नदीच्या दोन्ही तीरावर अशा प्रकारे सीमांकन करण्यात येणार आहे. त्यासाठी २२ लाख ४६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तत्कालीन पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून हा निधी जिल्हा नियोजन मंडळातून मंजूर झाल्याची माहिती त्यांनी पत्रकातून दिली आहे.
मंजूर निधीतून ठराविक नव्वद मीटर अंतरावर काँक्रिट पिलर उभे करून पूरबाधित क्षेत्र आणि सुरक्षित रेडलाईन, ब्लू लाईन क्षेत्र याच्या सीमा दर्शविल्या जाणार आहेत. कामाची निविदा प्रक्रिया लवकरच होणार असून पावसाळ्यापूर्वी पाटबंधारे खात्याकडून हे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिका आणि प्रयाग ते रुकडीपर्यंतच्या सर्व गावांना पूरनियंत्रणाची लाल आणि निळी रेषा माहिती होणार आहे. त्यानुसार पुरापासून संरक्षण आणि दक्षता घेण्यासाठी वरणगे पाडळी ते रुकडी या ४१ किलोमीटरच्या दोन्ही तीरावरील गावांना पूररेषेची संपूर्ण माहिती मिळणार असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.