
भारतीय कम्युनिस्ट पक्ष निदर्शने
82579
....
अदानी समूहाच्या
घोटाळ्याची चौकशी करा
भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे अर्थसंकल्पाविरोधात निदर्शने
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः श्रीमंतांना अधिक श्रीमंत करणारा व गरिबांना अधिक गरीब करणारा अर्थसंकल्प नुकताच जाहीर झाला आहे. त्याविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आज निदर्शने झाली. अदानी समूहाने केलेल्या घोटाळ्याची समितीच्या माध्यमातून सखोल चौकशी करावी, अशी जोरदार मागणीही यावेळी करण्यात आली.
जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे म्हणाले, ‘अर्थसंकल्प सुमारे ४७ लाख कोटी रुपयांचा आहे. सध्या चर्चेत असलेल्या हिंडेनबर्गच्या अहवालात अदानी समूहाने मनीलॉन्ड्रींग केल्याचे पुराव्यासकट मांडले आहे. तरीही भाजप किंवा मोदी सरकार गप्प का? अजून देखील गुन्हा का नोंद करण्यात आलेला नाही?’
शहर सचिव रघुनाथ कांबळे म्हणाले, ‘अदानी समूहाच्या घोटाळ्याबाबत पंतप्रधान एक शब्दही काढत नाहीत. वास्तविक संसदीय चौकशी समितीमार्फत त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे.’
ज्येष्ठ नेते दिनकर सूर्यवंशी, दिलीप पवार, बी. एल. बर्गे यांनी सर्वसामान्य फेरीवाले, कामगार, शेतकरी व जनता यांच्याविरोधी हा अर्थसंकल्प असल्याचे सांगितले. यावेळी दिलदार मुजावर, उत्कर्ष पवार, सादिक मुल्ला, मारुती नलवडे, भगवान पाटील, रमेश वडणगेकर, आशा बर्गे, इम्तियाज हकीम,आनंदा चौगुले आदी उपस्थित होते.