Thur, June 1, 2023

जागृती प्राथमिकमध्ये पालक मेळावा
जागृती प्राथमिकमध्ये पालक मेळावा
Published on : 15 February 2023, 1:57 am
जागृती प्राथमिकमध्ये पालक मेळावा
गडहिंग्लज : येथील जागृती प्राथमिक विद्या मंदिरमध्ये पालक मेळावा झाला. या मेळाव्यात शिक्षक, पालक, विद्यार्थी, पदाधिकारी यांच्यात सुसंवाद राहण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा झाली. शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष अशोक लोहार अध्यक्षस्थानी होते. मुख्याध्यापक विजय चौगुले, प्रशासन अधिकारी प्रा. सुनील देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापिका एम. एस. आजरी यांनी प्रास्ताविक केले. या मेळाव्यात शैक्षणिक उठावासंदर्भात विविध सूचना करण्यात आल्या. रेश्मा पाटणे, मल्लिकार्जुन लिंगोजी, दिगंबर पाटील, सचिन वाळकी यांनी सूचना मांडल्या. सारिका बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले. जयश्री गुरव यांनी आभार मानले.