
समाजसुधारणा सेवाभावी मंडळाच्या फलकाचे चंदगड येथे अनावरण
82708
चंदगड ः शिवाजीराव पाटील यांचे स्वागत करताना भीमसेन राजहंस. शेजारी लक्ष्मण गावडे, सुनील काणेकर, अरुण देसाई आदी.
समाजसुधारणा सेवाभावी मंडळाच्या
फलकाचे चंदगड येथे अनावरण
चंदगड ः येथील चंदगड तालुका समाजसुधारणा सेवाभावी मंडळाच्या नामफलकाचे अनावरण भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव पाटील व अभयकुमार वन्टे यांच्या हस्ते झाले. मंडळाचे अध्यक्ष भीमसेन राजहंस यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी विविध क्षेत्रांत यश मिळवलेल्या गुणवंतांचा सत्कार झाला. यामध्ये रोषणी सुतार, पवनकुमार राजहंस, राघोबा वरपे यांचा समावेश होता. शिवाजीराव पाटील म्हणाले, ‘समाजातील वंचित, गरीब, अन्यायग्रस्त माणसाला न्याय देण्यासाठी संघटनेने घेतलेले कष्ट स्तुत्य आहेत.’ वन्टे यांनीही मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. या वेळी मंडळाचे उपाध्यक्ष नरसू पाटील, किरण सुतार, गोपाळ आवडण, सुनील भाणेकर, दत्ता देशमुख, लक्ष्मण गावडे, बाळासाहेब मेणसे, शशिकांत सावंत, नामदेव कांबळे, विलास देसाई, अरुण देसाई, शंकर देशमुख, अॅड. अर्जुनराव राजहंस, अशोक पेडणेकर, अॅड. निवृत्ती आजरेकर, अशोक पाटील, दयानंद काणेकर, सुनील काणेकर, नामदेव पाटील उपस्थित होते.