
सुंदर हस्ताक्षर, मुद्देसुद लेखन वाचकाला भावते, प्राचार्य गावडे
chd143.jpg
मजरे-कारवे : स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करताना प्राचार्य एम. एम. गावडे. शेजारी नितीन पाटील, संदीप पाटील, संजय साबळे आदी.
सुंदर हस्ताक्षर, मुद्देसुद लेखन वाचकाला भावते
प्राचार्य गावडे; फुले विद्यालयात बक्षीस वितरण समारंभ
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १४ : सुंदर हस्ताक्षर आणि मुद्देसुद लेखन वाचकाला भावते. त्यासाठी विद्यार्थीदशेतच अक्षराला योग्य वळण लागणे गरजेचे आहे. त्याचबरोबर विषयाला धरून मुद्देसुद लेखन करण्याच्या हेतूने निबंध लेखन महत्त्वाचे ठरते, असे मत मजरे-कारवे (ता. चंदगड) येथील महात्मा फुले विद्यालयाचे प्राचार्य एम. एम. गावडे यांनी व्यक्त केले. चंदगड तालुका मराठी अध्यापक संघातर्फे हस्ताक्षर व निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. बळीराजा शेतकरी संघटनेचे नितीन पाटील प्रमुख उपस्थित होते.
हस्ताक्षर स्पर्धेत लहान गटातील श्रेया कांबळे, देविका बल्लाळ, सायली ठाकरे, सृष्टी गावडे, स्वराली पाटील, धनश्री शिवणगेकर, स्वरूप पाटील, तर मोठ्या गटातील ओमकार फाटक, शिवाणी मलतवाडकर, वैष्णवी आदकारी, वेदांती पाटील, स्वरांजली पाटील, हर्षद कांबळे, स्वयंभू कांबळे, मनाली पाटील, तसेच निबंध स्पर्धेत लहान गटातील आयुष्या फडके, सेजल मंडलिक, आर्या नीळकंठ, समीक्षा सुतार, सोनल सुरुतकर, श्रीज्योत पाटील, निकिता पाटील, जान्हवी पाटील व मोठ्या गटातील श्रावणी सुरुतकर, तेजस शिंदे, प्रेरणा पाटील, रागिणी पाटील, संतोष कांबळे, अंजली पवार, वैष्णवी राऊत, श्रध्दा देसाई यांचा पारितोषिके देऊन सत्कार झाला. प्रा. शिवाजी मोहनगेकर यांचा मराठी प्रेरणा पुरस्काराने सन्मान झाला. नितीन पाटील, रवी पाटील, देविका बल्लाळ, सुभाष बेळगावकर यांनी मनोगते व्यक्त केली. व्ही. एल. सुतार, फिरोज मुल्ला, प्रा. शाहू गावडे, डी. व्ही. पाटील, प्रेमा पवार, नेत्रा पाटील, बल्लाळ, राजेंद्र शिवणगेकर, संदीप पाटील उपस्थित होते. संजय साबळे यांनी स्वागत केले. एन. एन. शिवणगेकर यांनी प्रास्ताविक केले. बी. एन. पाटील यांनी आभार मानले. एच. आर. पाऊसकर यांनी सूत्रसंचालन केले.