हलकर्णी महाविद्यालयात 
राज्यस्तरीय शुक्रवारी चर्चासत्र

हलकर्णी महाविद्यालयात राज्यस्तरीय शुक्रवारी चर्चासत्र

शुक्रवारी हलकर्णी महाविद्यालयात
राज्यस्तरीय चर्चासत्र
चंदगड, ता. १४ ः हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शुक्रवारी (ता. १७) माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील भाषांचे अध्यापन, या विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्र होणार आहे. महाविद्यालयातील मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या वतीने हा उपक्रम होत आहे. प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर यांनी ही माहिती दिली. संस्थेचे ज्येष्ठ संचालक गोपाळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पहिले चर्चासत्र होईल. संस्थेचे अध्यक्ष अशोक जाधव यांच्या हस्ते उद्‍घाटन होईल. विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी. एम. हिर्डेकर बीजभाषक म्हणून उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या सत्रात मराठीचे अध्यापन या विषयावर कोल्हापूर येथील नाईट कॉलेजचे मराठी विभागप्रमुख डॉ. अरुण शिंदे मार्गदर्शन करतील. राजाराम कॉलेजचे डॉ. रघुनाथ कडाकणे इंग्रजी विषयावर, तर डॉ. अर्जुन चव्हाण हिंदी विषयावर मार्गदर्शन करतील. तिसऱ्या सत्रात डॉ. आय. आर. जरळी व प्रा. एस. एन. खरुजकर एकत्र चर्चासत्राचे संयोजन करतील. संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील यांच्या उपस्थितीत चौथे आणि समारोपाचे चर्चासत्र होईल, असे प्राचार्य डॉ. अजळकर व समन्वयक प्रा. पी. ए. पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com