
यिन निवडणूक
यिन लोगो मस्ट
-
12058, 12060
-
12062, 12064
-
12066, 12068
-
12070, 12072
-
12074, 12076
-
12078, 12080
-
12082, 12084
-
विजयी उमेदवारांसह
समर्थकांचा जल्लोष
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ : गुलालाची उधळण व आतषबाजीत यिन अध्यक्ष व उपाध्यक्षपदी निवडून आलेल्या उमेदवारांनी जल्लोष केला. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या यंग इन्स्पिरेटर्सतर्फे (यिन) निवडणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्ह्यातील महाविद्यालयांत मतदान झाल्यावर निवडून कोण येणार, याची उत्सुकता होती. उमेदवारांनी जोरदार प्रचार करीत निवडणुकीत रंगत आणली होती. सोशल मीडियाद्वारे त्यांनी त्यांचे जाहीरनामे जाहीर केले होते. मतदानादिवशी इर्ष्येने मतदान झाल्याने मतमोजणीत मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार, याची उत्कंठा होती. मतमोजणीत बाजी मारल्याचे कळताच विजयी उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. पराभूत उमेदवारांनी त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या. ‘यिन’चे सहायक व्यवस्थापक अवधूत गायकवाड यांनी निवडणुकीचे संयोजन केले.