घरफाळा जमा

घरफाळा जमा

घरफाळा दंडव्याज
सवलतीतून ४ दिवसात
१ कोटी ७१ लाख जमा

कोल्हापूर, ता. १४ : घरफाळा थकीत रक्कमेवरील दंड व्याज सवलत योजनेअंतर्गत चार दिवसात १ कोटी ७१लाख रक्कम जमा झाली.
फेब्रुवारीमध्ये चालू मागणीसह थकबाकीची रक्कम एकरकमी भरणा केल्यास दंडव्याजात ५० टक्के व मार्चअखेर ४० टक्के याप्रमाणे सवलत योजना जाहीर केली आहे. ९ ते १४ फेब्रुवारीअखेर १०१० करदात्यांनी १ कोटी ७१ लाख १९ हजार थकीत रक्कम जमा केली आहे. १ एप्रिल २०२२ ते १४ फेब्रुवारी २०२३ अखेर ८८ हजार ८०४ करदात्यांकडून ५३ कोटी ४८ लाख ८२ हजार रक्कम जमा झाली आहे.
कर भरणा करण्यासाठी कार्यालयीन दिवसाखेरीज शनिवारीही नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवली आहेत. प्रभागातील कचरा उठाव करणारे ऑटो टिपर, परिवहन उपक्रमाकडील बसेस व जाहिरात फलकाद्वारे प्रबोधन करण्यात येत आहे. जास्तीत जास्त लाभ घेऊन थकीत रक्कम भरणा करावी व जप्ती, मिळकतींवर बोजा नोंद होण्याचे प्रसंग टाळावेत असे आवाहन घरफाळा विभागाने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com