निवेदन

निवेदन

राज्य एड्स नियंत्रण कर्मचारी
संघटनेचे मागण्यांबाबत निवेदन


कोल्हापूर ः महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी आज जरगनगरमध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, संस्थेतर्फे संपूर्ण राज्यामध्ये अनेक कर्मचारी विविध पदांवर कार्यरत आहेत. 15 ते 20 वर्षे एड्स नियंत्रण कार्यक्रमांमध्ये सेवा बजावत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या योग्य नियोजनामुळे जिल्ह्यातील एड्स नियंत्रण दर कमी आला आहे. कोविडचे स्वॅब घेणे, प्रयोगशाळा चालवणे, समुपदेशन करणे, रुग्णांना एआरटी औषध वितरण करणे, माहिती भरणे अशी सर्व कामे एड्स नियंत्रण कर्मचाऱ्यांवरच आधारलेली आहेत. कोरोना काळात या संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे सेवा करूनही त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रोत्साहन भत्ता किंवा मोबदला मिळालेला नाही.
केंद्र, राज्य स्तरावर हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून संबंधित खात्यांकडे पाठपुरावा करून हा प्रश्न लवकरात लवकर सोडवू अशी ग्वाही चिकोडे यांनी दिली. संघटनेचे अध्यक्ष प्रदीप शिंदे, मकरंद कांबळे, सतीश पाटील, शुभम पाटील, मकरंद चौधरी, सुनिल पोतदार, सुजाता पाटील, महेश्वरी करगुपी, पूजा पाटील, मनीषा माने आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com