कौशल्य विकास व रोजगार- भाग एक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कौशल्य विकास व रोजगार- भाग एक
कौशल्य विकास व रोजगार- भाग एक

कौशल्य विकास व रोजगार- भाग एक

sakal_logo
By

मालिका लोगो- कौशल्य विकासाच्या संधी ः
भाग- एक
..
मालिका लीड
जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना किमान कौशल्य कार्यक्रमांतर्गत मोफत प्रशिक्षणाबरोबरच रोजगार व स्वयंरोजगार निर्मितीवर भर दिला जातो. कोरोना आणि त्यानंतरच्या काळात शासनाच्या विविध कौशल्य विकास योजना आणि झालेल्या रोजगार निर्मितीचा घेतलेला हा धांडोळा...
..

साडेचार हजारांवर उमेदवारांना मोफत प्रशिक्षण
जिल्ह्यातील तीन वर्षांचे चित्र, रोजगार मेळाव्यातून ९९७ जणांना हक्काची नोकरी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ ः शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून तीन वर्षांत चार हजार ७७६ उमेदवारांना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण दिले. रोजगार मेळाव्यातून ९९७ जणांना हक्काची नोकरी मिळाली असून, यातून खासगी उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरवले आहे.
किमान कौशल्य विकास कार्यक्रम जिल्हास्तरीय सर्वसाधारण योजनेतून २०२०-२१ या वर्षात एक हजार ११० तर २०२१-२२ या वर्षात एक हजार ८९७ उमेदवारांना मोफत कौशल्य प्रशिक्षण दिले. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानातून ४३० जणांना, तर प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेतून अडीचशे जणांना प्रशिक्षण मिळाले. याच योजनेतून हेल्थकेअर क्षेत्रासाठी सहा प्रकारच्या क्रॅश कोर्ससाठी ४८९ जणांना मोफत प्रशिक्षण कार्यक्रम राबवला. मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमातून आरोग्य विभागासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी ३६ कोर्ससाठी मोफत प्रशिक्षण कार्यक्रम झाला. त्याचा लाभ सहाशे उमेदवारांनी घेतला.


चौकट
स्टार्ट अप प्रशिक्षण व नवसंकल्पना
महाराष्ट्र स्टार्ट अप आणि नावीन्यता यात्रा २०२२ च्या माध्यमातून स्टार्ट अप क्षेत्रासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण, नवसंकल्पना सादरीकरण स्पर्धा झाली. शेती, शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास, स्वच्छ पाणी, ऊर्जा, कचरा व्यवस्थापन, स्मार्ट पायाभूत सुविधा, गतिशीलता, ई-प्रशासन अशा सात विविध क्षेत्रासाठी १०३ उमेदवारांनी नवसंकल्पनांची नोंदणी केली. त्यापैकी ६३ उमेदवारांनी सादरीकण केले. सोहिली पाटील व डॉ. स्नेहल माळी यांना राज्यपातळीवर आरोग्य क्षेत्रासाठीचा सर्वोत्कृष्ट महिला उद्योजिकतेचा पुरस्कार मिळाला.

कोट
कोरोनानंतर रोजगारासाठी नोंदणी व मेळाव्यांनाही प्रतिसाद मिळत आहे. या माध्यमातून बेरोजगार तरुणाईला हक्काचा रोजगार मिळतोच. त्याशिवाय स्वयंरोजगार निर्मितीवरही अधिक भर दिला जातो आहे. याच आठवड्यात सांगरूळमध्ये होणाऱ्या रोजगार मेळाव्यातून खासगी आस्थापनातील एक हजारांहून अधिक रिक्त पदांसाठी मार्गदर्शन व भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
- संजय माळी, सहाय्यक आयुक्त,
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र

चार्ट करणे

२०२०-२१
आयोजित मेळावे- ५
सहभागी उद्योजक- ५४
अंतिम निवड- १५७

२०२१-२२
आयोजित मेळावे-७
सहभागी उद्योजक-४८
अंतिम निवड-७८

२०२२-२३
आयोजित मेळावे-१४
सहभागी उद्योजक-२३७
अंतिम निवड-७६२.