महापालिकेला नोटीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेला नोटीस
महापालिकेला नोटीस

महापालिकेला नोटीस

sakal_logo
By

शासकीय कार्यालयांच्या पाणीपट्टी
थकबाकी वसुली मोहीम होणार तीव्र

कोल्हापूर, ता. १४ ः आतापर्यंतची थकबाकी न भरल्यास पाणीपुरवठा तोडण्याची नोटीस पाटबंधारे विभागाने महापालिकेला दिली आहे. त्यानुसार महापालिका थकबाकीपोटी दोन कोटी रुपयांचा भरणा करणार आहे. तसेच इतर रक्कम भरण्यासाठी शासकीय कार्यालयांबरोबर इतरांच्या थकबाकीची वसुलीची मोहीम महापालिका तीव्र करणार आहे.
पाटबंधारे विभागाने नदीतील पाणी उचल करण्यासाठी महापालिकेशी करार केलेला आहे. त्‍याप्रमाणे महिन्याला तीन ते पाच कोटींपर्यंतची आकारणी होते. त्याबरोबरच यापूर्वी दराबाबतचा वाद असल्याने त्याची मोठी थकबाकी दिसत असल्याचे महापालिकेचे मत आहे. या साऱ्यातून ८० कोटींवरील थकबाकीची नोटीस पाटबंधारे विभागाने महापालिकेला पाठवली आहे. महापालिकेनेही नियमित बिलाप्रमाणे दोन कोटी रुपयांचा भरणा करण्याचे नियोजन केले आहे.
पाणीपुरवठा विभागाची मोठी थकबाकी आहे. त्यात अनेक शासकीय कार्यालयांचाही समावेश आहे. ती वर्षानुवर्षे चालत आली आहे. महापालिकेने सध्या जरी काही रक्कम पाटबंधारेला भरली असली तरी इतर रक्कम भरण्यासाठी थकबाकी वसुलीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शासकीय कार्यालयांकडून थकबाकी वसुलीसाठीची मोहीम तीव्र केली जाणार असल्याने जलअभियंता हर्षजित घाटगे यांनी सांगितले.