कुत्र्याला ठार मारल्या प्रकरणी गुन्हा दाखल

कुत्र्याला ठार मारल्या प्रकरणी गुन्हा दाखल

कुत्र्याला ठार मारल्याप्रकरणी एकावर गुन्हा

बालिंग्यातील प्रकारः प्राणिप्रेमींच्या तक्रारीवरून कारवाई


कोल्हापूर, ता. १४ ः घरात आलेल्या भटक्या कुत्र्याच्या पिल्लाला काठीने ठार मारल्याप्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पीपल फॉर ॲनिमल सोसायटीच्या प्रशांत साठे यांच्या तक्रारीवरून करवीर पोलिसांनी ही कारवाई केली. नारायण विठ्ठल पित्रे असे संशयित आरोपीचे नाव आहे. सोमवारी (ता. १३) हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण पित्रे हे बालिंगा येथे राहतात. त्यांच्या घरामध्ये एका भटक्या कुत्र्याचे पिल्लू आले होते. यावेळी पित्रे यांनी त्याला काठीने मारहाण केली. यामध्ये त्या पिल्लाचा मृत्यू झाला. याची माहिती कळताच पीपल फॉर ॲनिमल सोसायटीच्या प्रशांत साठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत असलेल्या पिलाला त्यांनी डॉ. संतोष वाळवेकर यांच्या दवाखान्यात नेऊन वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्या पिलाचा मृत्यू झाला. त्यामुळे साठे यांनी पित्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
-------------------
प्राणिप्रेमींची निदर्शने

प्राणिप्रेमींनी पित्रे यांच्या घरासमोर निदर्शने केली. यामध्ये प्रशांत साठे, मार्क गर्दे, करुणा लोखंडे, मीनाक्षी कांबळे, माया जाधव, अंजली तुंगडकर, हेमा बोरकर, चाँद सौदागर, विवेक पटवर्धन यांच्यासह प्राणिप्रेमी कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. पित्रे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com