
कौलगे शाळेत श्लोक पाठांतर स्पर्धा
gad154.jpg
82960
कौलगे : न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झालेल्या श्लोक पाठांतर स्पर्धेत सहभागी विद्यार्थिनी. व्यासपीठावर विश्वजित चव्हाण, विलास कुलकर्णी, विभावरी कुलकर्णी उपस्थित होते.
------------------------
कौलगेत श्लोक पाठांतर स्पर्धा
गडहिंग्लज : कौलगे (ता. गडहिंग्लज) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये श्लोक पाठांतर स्पर्धा झाली. संतसेवक नीळकंठ महाराज रामदासी यांच्या पुण्यतिथीनिमित्त समर्थ सेवा ट्रस्टतर्फे या स्पर्धेचे आयोजन केले होते. पाचवी ते सातवी लहान गट व आठवी ते दहावी मोठा गट असा दोन गटात ही स्पर्धा झाली. लहान गटात सलोनी जाधव, अमृता जाधव, मधुरा कांबळे यांनी तर मोठ्या गटात प्रज्ञा मोहिते, श्रद्धा वडर, स्नेहा पताडे व शंभूराजे देसाई यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळवले. स्वाती पाटील व सुनील माने यांनी स्पर्धेचे परिक्षण केले. विश्वजित चव्हाण, बळीराम पाटील, दीपक सावंत, सुरेखा नंदनवाडे, नामदेव यादव, बाळासाहेब मोहिते, दुंडाप्पा कांबळे, गजानन काटकर आदी उपस्थित होते.