
गडहिंग्लजला संत सेवालाल जयंती
82964
गडहिंग्लज : संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी वसंत शेटके, संग्राम सावंत, दिलीप पवार, बाबू पवार उपस्थित होते.
गडहिंग्लजला संत सेवालाल जयंती
गडहिंग्लज : येथील बंजारा समाजातर्फे संत सेवालाल महाराज यांची २८४ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संत सेवालाल यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. दसरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणुकीला प्रारंभ झाला. नायब तहसीलदार जीवन क्षीरसागर, मुक्ती संघर्ष समितीचे अध्यक्ष संग्राम सावंत, वसंत शेटके, दिगंबर विटेकरी, बंजारा समाजाचे कार्यकर्ते दिलीप पवार, बाबू पवार आदी उपस्थित होते. मुख्य मार्ग, कडगाव रोड, वडरगे रोडवरून ही मिरवणूक नवनाथनगर येथे आली. या ठिकाणी वसंत शेटके यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. अमर मदकरी, श्रीकांत राठोड, किसन राठोड, देसू पवार, पापा मुकादम, सोनू चव्हाण, मंगेश राठोड, चांदुबाई राठोड, सुनीता राठोड, माधवी पवार, शेखर पवार, उमेश चव्हाण, राजू राठोड, धर्म राठोड यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. त्यानंतर अन्नदान करण्यात आले.