
शरद इंजिनिअरिंगमध्ये डीप लर्निंगवर कार्यशाळा
शरद इंजिनिअरिंगमध्ये
डीप लर्निंगवर कार्यशाळा
दानोळी, ता. १५ : यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ‘डीप लर्निंग’ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा झाली. इंटरनॅशनल अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटींग कम्युनिटी (IACC) व शरद इंजिनिअरिंगच्या कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग व आर्टिफिशियल इंटेलिजेन्स अॅण्ड डाटा सायन्स विभागाकडून आयोजित कार्यशाळेत एनव्हिडीया डीएलआय इन्स्ट्रक्टर डॉ. सुनितकुमार गुप्ता यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत दोनशेपेक्षा अधिक प्राध्यापक, विद्यार्थी, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले होते.
यामध्ये मशिन लर्निंग रिकॅप, अॅक्टिव्हेशन फंक्शन, न्यूरल नेटवर्क, इव्हॅल्युएशन मटेरिअल, एरर अॅनिलेसिस, ऑप्टिमायझेशन मेथड, हायपर पॅरामिटर ट्युनिंग, ट्रान्स्फर लर्निंग, इन्सप्शन नेटवर्क, ट्रान्स्फर लर्निंग, लँडमार्क डिटेक्शन, एएनएन-आरएनएन, सिक्वेन्शल प्रोसेसिंग विथ आरएनएन, फॉरवर्ड अॅण्ड बॅक प्रोपोगेशन, लँग्वेज मेथड, सेंटीमेंट अॅनॅलिसिस, इमेस कॅप्शनिंग, मशिन ट्रान्सलेशन, स्पीच ट्रान्सक्रिप्शन यांसह विषयाचे थेअरी व प्रॅक्टिकल प्रशिक्षण देण्यात आले.
कार्यशाळेचे संयोजन संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. एस. ए. खोत यांच्या सहकार्याने कॉम्प्युटर सायन्स विभागप्रमुख डॉ. पुष्पेंदर सराव, समन्वयक प्रा. एस. एस. मलमे, प्रा. व्ही. पी. खरगे, एआयडीएस विभागाचे विभागप्रमुख डॉ. शशिधर गुरव, प्रा. प्रशांत पाटील, प्रा. पी. बी. शिंदे, प्रा. पी. डी. पाटील, प्रा. वर्षा जुजारे यांनी केले.