संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त बातम्या
संक्षिप्त बातम्या

संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

82992
कोल्हापूर : महेंद्र महाजन यांचा शिवाजी परीट यांनी कोल्हापुरी सेंद्रिय गूळ देऊन सत्कार केला.

महाराष्ट्र अधिकृत ऑडिटर
असोसिएशनची शिर्डी येथे परिषद
कोल्हापूर : महाराष्ट्र अधिकृत ऑडिटर असोसिएशनची राज्यव्यापी परिषद शिर्डी येथे झाली. धर्मादाय आयुक्त (मुंबई) महेंद्र महाजन प्रमुख उपस्थित होते. असोसिएशनचे अध्यक्ष प्रभाकर पवार यांनी स्वागत केले. सचिव राजप्रसाद राजवैद्य यांनी असोसिएशनचा कार्याचा आढावा घेतला. अधिकृत ऑडिटरांच्या मागण्या मांडल्या. महाजन यांना परिषदेत लेखी निवेदन दिले. बी. डी. खान यांनी न्यासाच्या अडचणी मांडल्या. राज्यात नऊ लाख ३३ हजार ट्रस्ट असून, वार्षिक ऑडिट रिपोर्ट मात्र ८३ हजार दाखल होतात ही खंत व्यक्त केली. सर्व ट्रस्टनी वार्षिक ऑडिट रिपोर्ट ३० सष्टेंबरपूर्वी दाखल करावेत; अन्यथा त्यानंतर येणारे ऑडिट रिपोर्ट दंडास पात्र ठरतात, असा कायदा आहे. ट्रस्ट या प्रवाहात येत नाहीत. यापुढे संधी देऊनही ऑडिट रिर्पोटबद्दल अर्ज दाखल होणार नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करणे भाग पडेल, अशा इशारा दिला. दरम्यान, महाजन यांचा कोल्हापूर येथील सदस्य शिवाजी परीट यांनी कोल्हापुरी सेंद्रिय गूळ देऊन सत्कार केला. खान यांनी आभार मानले. प्रभाकर पवार, प्रवीण राजवैद्य, अकबर अली शहापूरवाला, आनंद यादव, मीर जावेद अली, अमिन बागवान, राज्यातील सर्व अधिकृत ऑडिटर उपस्थित होते.

82976
कोल्हापूर : विकास जोशी यांचा सत्कार उमेश शिंदे यांनी केला. या वेळी डावीकडून ॲड. प्रशांत चिटणीस, ॲड. धनंजय पठाडे, किरण रेडेकर, देवेंद्र शिंदे आदी.

विद्यापीठ सोसायटीची वार्षिक सभा
कोल्हापूर : विद्यापीठ सोसायटी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. सभेमध्ये २०२३-२८ कालावधीसाठी संस्थेच्या अध्यक्षपदी विकास जोशी यांची एकमताने फेरनिवड केली. उपाध्यक्ष म्हणून किरण रेडेकर, सचिव अॅड. प्रशांत चिटणीस, खजानीसपदी देवेंद्र शिंदे यांची एकमताने निवड झाली. जोशी यांचा उमेश शिंदे, ॲड. चिटणीस, ॲड. धनंजय पठाडे, रेडेकर, शिंदे यांच्या हस्ते सत्कार केला. विद्यापीठ संस्थेच्या विविध शाखांमधून अंदाजे ६००० विद्यार्थी शिक्षण घेतात. शिक्षक, कर्मचारी संख्या २२५ पर्यंत आहे. विद्यापीठ संस्थेचे माजी विद्यार्थी राजकीय, संरक्षण, वैज्ञानिक, वैद्यकीय, चित्रपट, संगीत, क्रीडा अशा क्षेत्रांत योगदान देत आहेत.
--------------
82991
डॉ. सुजय पाटील यांना पुरस्कार
कोल्हापूर : कमला कॉलेजमधील मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. सुजय पाटील यांना ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था (टाकळीभान, ता. श्रीरामपूर) संस्थेचा राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापन सेवा कार्य गौरव पुरस्कार जाहीर झाला. शनिवारी (ता. १८) टाकळीभान येथे होणाऱ्या पहिल्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात डॉ. श्रीपाल सबनीस, आमदार लहुजी कानडे व मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होईल. प्रा. डॉ. पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या क्रमिक पुस्तकांचे लेखन, संपादन केले आहे. संत साहित्यविषयक स्वतंत्र पुस्तकांचे लेखन, संपादन केले. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या एम.फिल., पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांचे ते मार्गदर्शक आहेत.
-------------
फक्त फोटो
83248
कोल्हापूर : गागी देसाई टोपीवाले विद्याभवनचे स्नेहसंमेलन शाहू स्मारक भवनात झाले. संस्थेच्या अध्यक्षा मधुरिमाराजे छत्रपती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. मंगेश गुरव, दुर्वास कदम, सचिव आशा पाटील, खजिनदार रंजना स्वामी, शाळा समिती सदस्या बिना मोहिते, शकुंतला जाधव उपस्थित होत्या. मुख्याध्यापिका सौ. रंजना शिंदे यांनी प्रास्ताविक केले. ज्योत्स्ना टोणपे यांनी परिचय करून दिला. विद्यार्थिनींनी कलागुणांचे सादरीकरण केले.
--------------