
आगामी निवडणुकांत राष्ट्रवादीला साथ द्या; आमदार पाटील
82983
जरळी : आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते विकासकामांचा प्रारंभ झाला. यावेळी रामाप्पा करिगार, अमर चव्हाण, सागर पाटील, जयसिंग चव्हाण, अभिजित पाटील आदी उपस्थित होते.
आगामी निवडणुकांत
राष्ट्रवादीला साथ द्या
आमदार पाटील; जरळीत विकासकामांना प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
नूल, ता. १५ : तीन वर्षांत मतदारसंघात चारशे कोटींची विकासकामे केली आहेत. या विकासकामांच्या जोरावर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीस सामोरे जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत मला साथ देऊन आमदार केलात त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना साथ द्यावी, असे प्रतिपादन आमदार राजेश पाटील यांनी केले.
जरळी (ता. गडहिंग्लज) येथे सुमारे ३० लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा प्रारंभ व लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. सरपंच सागर पाटील अध्यक्षस्थानी होते. आमदार पाटील म्हणाले, ‘‘स्व. नरसिंगराव गुरुनाथ पाटील, सदाशिवराव मंडलिक आणि स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या पुरोगामी विचारसरणीचा वारसा जपतच मतदारसंघात विकासात्मक वाटचाल सुरू आहे.’’
दरम्यान, विकासकामात नारायण डोंगरे यांच्या घरापर्यंत रस्ता, नदीपासून हाळवाडीकडे जाणारा रस्ता, आण्णाप्पा भोसले यांच्या घरापासून शिवानंद गौरोजी यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण, मारुती फुंडे यांच्या घरापासून अनिरुद्ध जोशी यांच्या घरापर्यंतचे गटर बांधकाम, कलाप्पा चौगुले ते नदीघाटपर्यंत गटर, गणपती जाधव ते शिवाजी डोंगरे यांच्या घरापर्यंतचे गटर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र ते राजू जाधव यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचा समावेश आहे. भीमगोंडा पाटील यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल चौगुले, अविनाश कुलकर्णी यांची भाषणे झाली. ग्रामसेवक सुरेश गुरव, रामाप्पा करिगार, अमर चव्हाण, जयसिंग चव्हाण, अनिकेत कोणकेरी, बाबूराव चौगुले, अभिजित पाटील, काकासाहेब दुंडगे, नारायण डोंगरे, ऋषिकेश पाटील, गंगाराम बाबाण्णावर, महाबळेश्वर चौगुले, शिवाजी बागडी, सुनील चोथे आदी उपस्थित होते.