आंबिल यात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबिल यात्रा
आंबिल यात्रा

आंबिल यात्रा

sakal_logo
By

83056, 83055

‘उदं ग आई’ च्या जयघोषात आंबील यात्रा
दर्शनासाठी गर्दी ः बावड्यातील रेणुका देवीची यात्रा उत्साहात

कसबा बावडा, ता. १५ ः ‘उदं ग आई उदं’ च्या जयघोषात आणि भाविकांच्या मोठ्या गर्दीत येथील रेणुका देवीची आंबील यात्रा आज भक्तिमय वातावरणात झाली. देवीला नैवैद्य देण्याबरोबरच दर्शनासाठी भाविकांची रात्री उशिरापर्यंत मंदिरात रांग लागली होती.
दरवर्षी माघी पौर्णिमेला सौंदत्ती (कर्नाटक) येथे भरणाऱ्या रेणुका देवीच्या यात्रेला कसबा बावडा, लाईन बाजार परिसरातील भाविक मोठ्या संख्येने जातात. या परिसरातील मानाचे जग व काही भाविक बैलगाडीने या यात्रेला जातात. यात्रेसाठी गेलेल्या या बैलगाड्या परत आल्यानंतर दुसऱ्या दिवशी या परिसरातील रेणुका देवीची आंबील यात्रा भरते. या गाड्या काल परत आल्यानंतर आज ही यात्रा झाली.
यात्रेनिमित्त पहाटे देवीला अभिषेक घालून पूजा बांधण्यात आली. ही पूजा सुरेश माळी, संतोष बिरंजे व बंडा भोसले यांनी बांधली. पूजा झाल्यानंतर देवीची आरती रेणुका भक्त मंडळाचे गजानन बेडेकर यांच्या हस्ते झाली. यावेळी बावड्यातील माजी नगरसेवक, श्रीराम सोसायटीचे पदाधिकारी, संचालक उपस्थित होते. यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले झाले.
सकाळपासूनच मंदिरात नैवैद्य देण्यासह दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती. सायंकाळनंतर या गर्दीत वाढ झाली. यामुळे मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक बंद ठेवली होती. मंदिर परिसरात खाद्य पदार्थांसह खेळण्यांचे स्टॉल लावले होते.