
मारामारी
मारामारीत एकजण जखमी
कोल्हापूर, ता. १५ ः भावांच्या जुन्या भांडणातून शास्त्रीनगर येथील रेड्याच्या टक्करीजवळ झालेल्या मारामारीत फिर्यादी जखमी झाला. ओंकार विनायक आरने असे त्याचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, आकाश माळगीकर, नीलेश कांबळे (रा. आर. के. नगर गल्ली, तीनबत्ती चौक) आणि ओंकार (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा नोंद केल्याची माहिती राजारामपुरी पोलिसांनी दिली. त्यांना अद्याप अटक केलेली नाही.
पोलिसांनी सांगितले, की शास्त्रीनगर येथील रेड्याच्या टक्करीजवळ मंगळवारी (ता. १३) रात्री साडेअकराच्या सुमारास भाऊ आशुतोष यांच्या जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी ओंकारला मारहाण करण्यात आली. कमरेचा पट्टा, लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नीलेश कांबळेने लोखंडी रॉड डोकीत मारून, तर आकाश माळगीकर याने कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. याबाबतची फिर्यादी ओंकारने काल राजारामपुरी पोलिस ठाण्यात दिली.