केंद्रीय मंत्री अतिम शहा दौरा बातमी

केंद्रीय मंत्री अतिम शहा दौरा बातमी

83052
...


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी कोल्हापुरात

विविध कार्यक्रमः कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ ः केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा रविवारी (ता.१९) कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून, त्यानंतर कार्यकर्ता मेळावा आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. शहा यांच्या दौऱ्याची तयारी युद्धपातळीवर सुरू असून, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी भव्य मंडप उभारण्याचे काम सुरू आहे.
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याची तयारीला वेग आला असून पेटाळा, राजहंस प्रिंटिंग प्रेससमोरील सभेची जागा येथे मांडव उभारणीचे काम सुरू आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोनवेळा अमित शहा यांच्या दौऱ्यातील ठिकाणांची पाहणी केली आहे. पार्किंगच्या जागा, आत येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी सर्व ठिकाणच्या जागांची निश्चिती पोलिस प्रशासनाच्या सूचनेनुसार निश्चित केली आहे. नागाळा पार्क येथील पक्षाच्या नूतन कार्यालयाच्या बांधकामाची पाहणी अमित शहा करणार आहेत. तसेच कार्यालयाच्या आवारातील गणेश मंदिराचे भूमिपूजन शहा यांच्या हस्ते होणार आहे. याच ठिकाणी ते लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. हॉटेल पॅव्हेलियनमध्ये ते प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर लोकसभा प्रवास योजनेचा आढावा घेणार आहेत.
----------

पोलिस प्रशासन सज्ज
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस दल सज्ज झाले आहे. शहा यांना भेटणाऱ्या व्यक्तींची यादी करण्याचे काम सुरू आहे. तसेच निवेदने आणि त्यांच्या कार्यक्रमांच्या नियोजनानुसार पोलिसांच्या बंदोबस्ताचे नियोजन करण्याचे काम सुरू आहे.

...
असा आहे दौरा

दुपारी १.३० वाजता विमानतळावर आगमन.
दुपारी १.४५ वाजता अंबाबाई मंदिरात देवीचे दर्शन.
दुपारी २.४० वाजता दसरा चौकातील शाहू महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण.
दुपारी २.४० ते ३.०० हॉटेल पंचशीलमध्ये राखीव
दुपारी ३.१५ वाजता पेटाळा मैदानावर न्यू एज्युकेशन संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थिती.
संध्याकाळी ५ वाजता राजहंस प्रेससमोर कार्यकर्ता मेळावा.
संध्याकाळी ७ ते ८ पंचशील हॉटेल येथे भोजन व विश्रांती
रात्री ८ वाजता पॅव्हेलियन हॉटेलमध्ये प्रमुख कार्यकर्ता बैठक
रात्री ९.२५ वाजता विमानाने दिल्लीला प्रयाण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com