
दहावी, बारावी परीक्षा केंद्र परिसरात कलम १४४ लागू
दहावी, बारावी परीक्षा केंद्र
परिसरात कलम १४४ लागू
कोल्हापूर ः इयत्ता दहावी, बारावी परीक्षेचे कामकाज सुयोग्य पध्दतीने तसेच कॉपीमुक्त होण्यासाठी परीक्षा केंद्राच्या आवार परिसरात २१ फेब्रुवारी ते २५ मार्च या कालावधीत (ज्या दिवशी पेपर नसतील ते दिवस वगळून) कलम १४४ लागू करण्यात आले आहे. रोज सकाळी सात ते सायंकाळी सहा यावेळेत कलम १४४ अन्वये मोबाईल फोन आणि त्यासंबंधी इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगण्यास अथवा वापरण्यास, झेरॉक्स मशिन, फॅक्स मशिन व लॅपटॉप यांचा वापर करण्यास अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी बंदी घातली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहतील. हा बंदी आदेश परीक्षेच्या कामकाजासाठी नेमलेले अधिकारी, कर्मचारी यांना आणि त्यांना नेमून दिलेल्या परीक्षेच्या कामकाजासाठी हाताळाव्या लागणाऱ्या उपकरणांसाठी लागू राहणार नाही, अशी माहिती कांबळे यांनी दिली आहे.