पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा एजंट अदयापही पसारच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा
एजंट अदयापही पसारच
पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा एजंट अदयापही पसारच

पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा एजंट अदयापही पसारच

sakal_logo
By

पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा
एजंट अद्यापही पसारच
---
बेकायदा गर्भलिंग निदानाचे रॅकेट शोधण्यातही अडथळे
सकाळ वृत्तसेवा
राधानगरी/कोल्हापूर, ता. १५ ः राधानगरी आणि गारगोटी परिसरात गर्भलिंग निदानासाठी वापरल्या जात असलेल्या पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा एजंट अद्याप पसारच आहे. त्याचा शोध अद्याप राधानगरी पोलिसांकडून सुरूच आहे. त्यामुळे गर्भलिंग निदान आणि मशिन पुरवठाधारकांचे रॅकेट उघडकीस येण्यात अडथळे निर्माण झाले. मशिन खरेदीदार मिळत नाही, तोपर्यंत याच्या मुळापर्यंत जाणे शक्य नाही.
राधानगरी-गारगोटीमध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान करीत असलेल्या बनावट डॉक्टरांचा पोलिसांनी पर्दाफाश केला. मात्र, हे रॅकेट मुळापासून उखडून काढण्यासाठी आवश्‍यक असलेल्या एजंटाचा शोध अद्याप सुरूच आहे. लवकरच एजंटाला अटक केली जाईल, असा विश्‍वास राधानगरी पोलिस ठाण्याच्या निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी व्यक्त केला.
गारगोटी-राधानगरी परिसरात पोलिसांनी छापा टाकून गर्भलिंग निदान करणाऱ्या बनावट डॉक्टरांना पकडले. मात्र, त्यांच्याकडे असलेले पोर्टेबल सोनोग्राफी मशिन नेमके कोठून आले, याचा शोध अद्याप लागलेला नाही. विशेष म्हणजे हे ‘चायना मेड’ मशिन असून, ते वापरण्यास बंदी आहे. तरीही त्याचा वापर करण्यात येत होता. ज्याच्याकडे हे मशिन सापडले, तो सध्या बेपत्ता आहे. तो सापडत नसल्याने तपास संथ झाला आहे. दरम्यान, मोबाईल सोनोग्राफी मशिन वापरण्यास बंदी असली तरीही त्याचाच वापर होऊन मोठ्या प्रमाणात गर्भलिंग निदान होत असल्याची माहिती पुढे आली.
---
संबंधित ॲपवरही बंदी हवी!
विशेष म्हणजे हे मशिन ऑनलाइन खरेदी होऊ शकते. कोणत्या ऑनलाइन ॲपवरून याची विक्री होते, त्या ॲपवर बंदी घालण्याची आवश्‍यता असल्याचे दिसून येत आहे. त्याची विक्री करणे आणि वापरणे दोन्ही गुन्हा आहे. तरीही त्याची विक्री होते, त्यामुळेच बेकादेशीर गर्भलिंग निदान होत आहे.
---