
पोलिस वृत्त एकत्रित
विषारी द्रव प्यायलेल्या एकाचा मृत्यू
कोल्हापूरः साके (ता.कागल) येथे विषारी द्रव प्यायल्याने प्रकृती चिंताजनक बनलेले पोपट दत्तात्रय म्हातुगडे (वय ५७) यांचा मृत्यू झाला. ‘खडी’ नावाच्या शेतातील जनावरांच्या गोठ्यात त्यांनी विषारी द्रव प्यायले होते. उपचार सुरू असताना मंगळवारी मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
-----------
बेशुद्ध अवस्थेत मिळालेल्या तरुणाचा मृत्यू
कोल्हापूरः व्हीनस कॉर्नर परिसरात ९ फेब्रुवारीला बेशुद्ध अवस्थेत मिळालेल्या तरुणाचा आज सीपीआरमध्ये मृत्यू झाला. त्याचे अंदाजे वय ३७ असून, तो अनोळखी आहे. आजारी अवस्थेत तो व्हिनस कॉर्नर येथे बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. त्याला सीपीआरमध्ये दाखल केले होते. आज त्याचा मृत्यू झाला. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
---------
महिला भाजून जखमी
कोल्हापूर ः चुलीवर पाणी तापवताना ड्रेसने पेट घेतल्याने ललिता नामदेव चौगुले (वय ३८) या जखमी झाल्या. पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथे आज सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. त्यांना पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले असून, याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
----------
सहा फुटांवरून पडल्याने बालिका जखमी
कोल्हापूर : गांधीनगर येथील कोयना कॉलनीमध्ये सहा फुटांवरुन पडल्याने चार वर्षांची बालिका जखमी झाली. अजमिना अली असे तिचे नाव आहे. राहत्या घरी हा अपघात घडला. तिच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
-------