
पत्रकांच्या काही बातम्या पत्रके
‘श्री दत्ताबाळ’मध्ये दहावीचा सदिच्छा समारंभ
कोल्हापूर : श्री दत्ताबाळ मिशन डिव्हाईन संचलित श्री दत्ताबाळ हायस्कूल, श्री दत्ताबाळ इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे दहावीच्या सदिच्छा समारंभ झाला. माजी प्राचार्य प्रा. हरिभाऊ वनमोरे यांनी मार्गदर्शन केले. दहावीतील सिद्धी नाईक, असिया लतीफ, सत्यजित शिंदे, श्रेयांगी पाटील, हर्ष लोखंडे, शिक्षिका सारिका चव्हाण, मानसी धनवडे यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी देसाई, सचिव निलेश देसाई, विश्वस्त वेद देसाई, व्यवस्थापक संदिप डोंगरे, मुख्याध्यापक सचिन डवंग, मुख्याध्यापिका कीर्ती मिठारी, रोहिणी शेवाळे, प्रणिता वर्धमाने उपस्थित होते. बालाजी मुंढे, प्रगती कोरडे यांनी सूत्रसंचालन केले. मेघना देशपांडे यांनी आभार मानले.
...
82988
कोल्हापूर : डॉ. चोपडे यांचा मॉरिशसमध्ये गौरव प्रसंगी उपस्थित मान्यवर.
डॉ. चोपडे यांचा मॉरिशसमध्ये गौरव
कोल्हापूर : भाषा सहोदरी हिंदी (दिल्ली) आणि मॉरिशसमधील महात्मा गांधी संस्थानतर्फे मॉरिशस येथे आयोजित नववे आंतरराष्ट्रीय हिंदी अधिवेशनात डॉ. संजय चोपडे यांना ‘सहोदरी रत्न’ पुरस्काराने सन्मानित केले. मॉरिशसचे राष्ट्रपती पृथ्वीराज सिंग रूपन, महानिदेशक रामकुमार रामप्रताप, ज्येष्ठ साहित्यिक रामदेव धुरंधर, प्रेमलता महादेव, निर्देशिका डॉ. विदोतमा कुंजल, जयकांत मिश्रा उपस्थित होते. डॉ. चोपडे यांची हिंदी -मराठीची १८ पुस्तके प्रकाशित झाली असून २०० हून अधिक शोध निबंध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पत्रिकांमध्ये प्रकाशित आहेत. त्यांनी मॉरिशसमध्ये ‘मॉरिशस में हिंदी नाटक, उपन्यास, कविता का विकास’ यावर शोधनिबंध सादर केला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी अभिनंदन केले.
...
''उषाराजे’मध्ये १० वी शुभेच्छा समारंभ
कोल्हापूर : उषाराजे हायस्कूलच्या शालांत परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थिनींचा शुभेच्छा समारंभ झाला. शिवाजी विद्यापीठाचे करिअर मार्गदर्शक प्रा. प्रसन्न करमरकर यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. एस. एन. पवार, विश्वस्त सौ. जे. एस. पाटील, प्रा. ए. एम. साळोखे, मुख्याध्यापिका एस. डी. चौधरी, उपमुख्याध्यापिका व्ही. डी. जमेनीस, पर्यवेक्षक एस. के. मिठारी, एस. एल. पुजारी, आर. सी. जाधव उपस्थित होते. आर. एम. कवठे यांनी मनोगत व्यक्त केले. पी. एस. पवार यांनी सुत्रसंचलन केले. पी. एस. तळेकर यांनी आभार मानले.
...
फक्त फोटो : 82999
कोल्हापूर : गागी देसाई टोपीवाले विद्याभवनचे स्नेहसंमेलन शाहू स्मारक भवनात झाले. संस्थेच्या अध्यक्षा मधुरिमाराजे छत्रपती अध्यक्षस्थानी होत्या. मंगेश गुरव, दुर्वास कदम, सचिव आशा पाटील, खजिनदार रंजना स्वामी, शाळा समिती सदस्या बीना मोहिते, शकुंतला जाधव उपस्थित होत्या. मुख्याध्यापिका रंजना शिंदे यांनी प्रास्ताविक केले. ज्योत्स्ना टोणपे यांनी परिचय करुन दिला.
...
83004
राजीव आवळे यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर
कोल्हापूर : सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंट, मुक्ता फाउंडेशनतर्फे शिवजयंती निमित्त ‘परिचित अपरिचित छत्रपती शिवराय’ यावर जिल्हा बार असोसिएशन माजी अध्यक्ष अॅड. प्रकाश मोरे यांचे जाहीर व्याख्यान रविवारी (ता. १९) व्याख्यान होईल. दुपारी एक वाजता शाहू स्मारक भवन येथे व्याख्यान होईल. माजी आमदार राजीव आवळे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अन्वी घाटगे, प्राचार्य डॉ. सतीश देसाई, छाया पाटील, शंकर अंदानी, शेख जावेद मंजूरपाशा, मोहन मिणचेकर, प्रा. डॉ. मोहन लोंढे, विजय साठे, रवींद्र श्रावस्ती, शंकर पुजारी, प्रा. प्रसाद दावणे, अपूर्वा पाटील, प्रा. डॉ. मारुती लोंढे, डॉ. विजय चांदणे, रूपा वायदंडे, प्रकाश सांडूगडे, काशिनाथ सुलाखेपाटील, डॉ. उत्तम सकट, बाबासाहेब माने, डॉ. सयाजीराव गायकवाड यांना राज्यस्तरीय व्यक्तीवेध पुरस्कारही देण्यात येत आहे.
-
कॉमर्स कॉलेजची ‘संविधान जागृती रॅली’
कोल्हापूर ः येथील देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सतर्फे संविधान जागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. पहिल्या दिवशी संविधान जागृती रॅली काढली. त्याचे उद्घाटन कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी केले. त्यांनी संविधान जाणून घेण्याचे महत्त्व सांगितले. प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील यांनी मार्गदर्शन केले. कॉमर्स कॉलेजमधील देशभक्त डॉ. रत्नाप्पा कुंभार यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅली सुरू झाली. बिंदू चौक, आईसाहेब महाराज पुतळा ते रविवार पेठ मार्गे रॅली कॉलेजमध्ये आली. त्यामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाल्या. संयोजन प्रा. डॉ. श्रीपाद देसाई यांनी केले.