बेरोजगार सोसायटीतूनही कुशल मनुष्यबळ

बेरोजगार सोसायटीतूनही कुशल मनुष्यबळ

लोगो - कौशल्य विकासाच्या संधी - भाग २

बेरोजगार सोसायटीतूनही कुशल मनुष्यबळ
तीन वर्षांत ३४ लाखांचा निधी खर्च; जिल्ह्यातील नोंदणीकृत २७९ पैकी ५१ संस्था कार्यरत
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत नोकरीबरोबरच बेरोजगार युवक व युवतींना मोफत प्रशिक्षण दिले जाते. मात्र, त्याच्याही पुढे जाऊन बेरोजगार सेवा सोसायट्यांच्या माध्यमातूनही कुशल मनुष्यबळाचा पुरवठा होतो. जिल्ह्यातील एकूण नोंदणीकृत २७९ बेरोजगार सेवा सोसायट्यांपैकी ५१ सेवा सोसायट्या सध्या कार्यरत असून त्यांना तीन वर्षांत तेवीस कामांसाठी चौतीस लाखांचा निधी खर्च झाला आहे.
नियमानुसार अकरा बेरोजगारांनी एकत्र येऊन ही सोसायटी स्थापन होते. त्याची सहकार विभागाकडे नोंदणी होते. या सेवा सोयायट्यांना शासकीय, निमशासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयामध्ये विविध कामे किंवा सेवा देण्यासाठी निविदांमध्ये शासनाने सूट दिली आहे. त्याशिवाय २०१५ साली या सोसायट्यांना तीन लाखांपर्यंतची कामे विना निविदा दिली जातात. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची जिल्हास्तरीय समिती त्यासाठी कार्यरत असून या समितीच्या माध्यमातून या संस्थांना सम प्रमाणात कामे दिली जातात. कोणत्याही सोसायटीवर अन्याय होऊ नये, म्हणून अधिक कामे असलेल्या सोसायटांना प्राधान्यक्रमात खाली स्थान ठेवून कमी काम असलेल्या संस्थांना सुरुवातीला कामे दिली जातात.
या समितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), सेवा सोसायटी फेडरेशन प्रतिनिधी आणि जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी यांचा समावेश आहे.
-----------------
चौकट
दहा लाखांपर्यंत मर्यादा वाढवावी...
उपवडे (ता. करवीर) येथील अंबाई बेरोजगार संस्थेचे रघुनाथ पेंडूरकर सांगतात, ‘आम्ही २०१३ साली संस्था स्थापन केली; पण पाच-सहा वर्षे कुठलाच अनुभव नसल्याने कामे मिळाली नाहीत. सध्या आमच्या संस्थेच्या माध्यमातून पाटबंधारे विभागाकडे एक कंत्राटी वाहन चालक, जिल्हाधिकारी कार्यालयात डाटा एंट्री ऑपरेटर, कौशल्य विकास कार्यालयाकडे सफाई कामगार असे मनुष्यबळ पुरवले आहे. सेवा सोसायट्या शासकीय, निमशासकीय कार्यालयांची रंगरंगोटी, प्लंबिग, साफ-सफाई अशा स्वरूपाची कामेही घेऊ शकतात.’ बेरोजगार सेवा सोसायट्यांना विना अनामत रक्कम किंवा तीन लाखांपर्यंतची कामे मिळत असली तरी तीन लाखांची मर्यादा असल्याने कामे मिळण्यालाही मर्यादा येत आहेत. त्यामुळे ही मर्यादा किमान दहा लाखांची करावी. मर्यादा वाढवल्यास सेवा सोसायट्यांना आणखी कामे मिळतील, अशी अपेक्षाही ते व्यक्त करतात.
-----------------
बेरोजगार संस्थांना कामाचे वाटप असे...
वर्ष*एकूण कामे*एकूण रक्कम (लाखांत)
२०२०-२१*११*१३.३६
२०२१-२२*०९*१४.४१
२०२२-२०२३*०३*६.४३ (जानेवारी २०२३ अखेर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com