पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण
पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण

पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण

sakal_logo
By

पोलिसांवर महोत्सव,
सणांमुळे बंदोबस्ताचा ताण

कोल्हापूर, ता. १६ ः महाशिवरात्री, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, सुमंगल लोकोत्सव, दख्खनचा राजा जोतिबाचे खेटे या बरोबरच अनेक व्हीव्हीआयपींचे कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील दौऱ्यांमुळे पोलिसांवर पुढील पंधरा दिवस ताण असणार आहे. त्याचे नियोजन करताना पोलिस अधिकाऱ्यांचीही दमछाक होत आहे. यासाठी परजिल्ह्यातील पोलिसांची मागणी केली आहे.
विशाळगड येथील उत्सवासाठी विशेष बंदोबस्ताचे नियोजन करण्यात येत आहे. तेथील अतिक्रणाच्या मुद्द्यामुळे सध्या विशाळगड चर्चेत आहे शिवजयंतीच्या निमित्ताने येणाऱ्या आणि जाणाऱ्या शिव ज्योतींचे स्वागत आणि मार्गावर होणारी वाहतूक कोंडी, त्यासाठी स्वतंत्र बंदोबस्त ठेवावा लागणार आहे. पन्हाळागडावर शिवप्रेमी, कार्यकर्ते यांची मोठी गर्दी होते. त्यांच्या बंदोबस्तासाठी तेथे खास नियोजन केल जात आहे. सध्या दख्खनचा राजा जोतिबाचे खेटे सुरू आहेत. त्यासाठी जिल्ह्यासह परजिल्हा आणि राज्यातून भाविक रविवारी डोंगरावर येतात. पंचगंगा नदीपासून ते जोतिबाच्या मंदिरापर्यंत मोठी गर्दी असते. याच मार्गावरून पन्हाळ्याकडेही जावे लागते. तेथेही बंदोबस्त ठेवावा लागणार आहे. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक गृह प्रिया पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महादेव वाघमोडे, विशेष शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत हे नियोजन करीत आहेत.

चौकट
परजिल्ह्यातील पोलिस येणार मदतीला
बंदोबस्तासाठी परजिल्ह्यातील ४० टक्के पोलिसांना कोल्हापुरात बोलाविण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यातील सुमारे ६० टक्के पोलिस पुढील पंधरा दिवस बंदोबस्तासाठी रस्त्यावर असणार आहेत. परजिल्ह्यतील पोलिसांच्या राहण्यासह जेवणाचीही व्यवस्था स्थानिक पोलिसांना करावी लागणार आहे.