अंगणवाडी कर्मचारी युनियनचे सोमवारपासून आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंगणवाडी कर्मचारी युनियनचे सोमवारपासून आंदोलन
अंगणवाडी कर्मचारी युनियनचे सोमवारपासून आंदोलन

अंगणवाडी कर्मचारी युनियनचे सोमवारपासून आंदोलन

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे
सोमवारपासून आंदोलन
उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यां‍ना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १६ : शासनाने मानधन वाढीसह अन्य सुविधा देण्याची घोषणा केली आहे. मात्र या आश्‍‍वासनांची पुर्तता न झाल्याने अंगणवाडी कृती समिती सोमवारपासून (ता.२०) राष्‍ट्रव्यापी बेमुदत संप करणार आहे. याबाबतचे निवेदन राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांच्यातर्फे महिला बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्‍पा पाटील यांना देण्यात आले.
निवेदनात म्‍हटले आहे, अंगणवाडी सेविकांना दरमहा ८३०० ते ८५०० रुपये, तर मिनी अंगणवाडी सेविकांना दरमहा ५८०० व मदतनीसांना ४२०० रुपये मानधन दिले जाते. शासनाने मानधन वाढ, दरमहा पेन्‍शन, आजारपणाची रजा, दर्जेदार मोबाईल, पोषण ट्रॅकर मराठीत करणे आदी प्रश्‍‍न सोडवण्यासाठी वेळोवेळी निवेदन देण्यात आले. मात्र याची पुर्तता न झाल्याने नाईलाजाने बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. तत्‍पुर्वी शासनाने होणाऱ्या आंदोलनाची योग्य ती दखल घेवून निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन रघुनाथ कांबळे, शुभांगी पाटील, सतिशचंद्र कांबळे, वर्षा लव्‍हटे, शकुंतला कोळी, रेखा पाटील यांच्या शिष्‍टमंडळाने दिले.