Thur, March 30, 2023

वाहनांवर कारवाई
वाहनांवर कारवाई
Published on : 16 February 2023, 4:27 am
रस्त्यावरील वाहनांवर
उद्यापासून कारवाई
कोल्हापूर, ता. १६ : शहरामध्ये रस्त्यावर लावलेल्या बेवारस व तसेच उभ्या केलेल्या वाहनांवर महापालिका व शहर वाहतूक नियंत्रण शाखा उद्यापासून (ता. १७) संयुक्त कारवाई करणार आहे. ही वाहने वाहतुकीस अडथळा ठरत असल्याने कारवाई केली जाणार आहे. ही वाहने मालकांनी काढून घ्यावी, अन्यथा ती जप्त करण्यात येणार आहेत. तरी ही वाहने काढून घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने केले आहे.